पाथर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद ; चोरीच्या घटना तपासात श्वेनपथक, ठसे तज्ज्ञ मग खूनप्रकरणात असा तपास का नाही ?

पाथर्डी पोलिसांचा तपास संशयास्पद ; चोरीच्या घटना तपासात श्वेनपथक, ठसे तज्ज्ञ मग खूनप्रकरणात असा तपास का नाही ?
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – पाथर्डी तालुक्यात मागील घडामोडी पाहाता खूनाच्या गंभीर गुन्ह्यांमध्येही पूर्ण तपास न करता पाथर्डी पोलिसांनी तपास गुंडाळून टाकत, आरोपींना एकप्रकारे अभय दिला आहे. एकीकडे फक्त चो-या झाल्यानंतरही, घटनास्थळी श्वेनपथक नेण्यात आले, तेथील ठसे घेण्यात आले आहेत. या दोन्ही घटनेच्या तपासाबाबत पाथर्डी पोलिसांची तपासाबाबत तफावत का? असा सवाल उपस्थित झाला नाही तर नवलच! यामुळेच पाथर्डी पोलिसांचा प्रत्येक यापूर्वी घडलेल्या घटनांच्या तपासाबाबत मुंबई पोलीस महासंचालक, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक व अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बारकाईने अभ्यास केल्यास पाथर्डी पोलिसांनी खूनप्रकरणाचा व चो-या झालेल्या ठिकाणा तपासाबाबत तफावत सर्रास आढळून येते, यात पाथर्डी पोलिसांनी खूनप्रकरणात तेवढं तत्परतेने तपास न करता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून तपास गुंडाळून टाकण्यासाठी का? प्रयत्न केला आहे. या गंभीर गुन्हयाच्या तपासाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. यामुळेच की काय पाथर्डी तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, पाथर्डी तालुक्यात पोलिसांचा वचक कमी झाला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पाथर्डी तालुक्यात खून, हापमर्डर, चो-या, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर फसवणुकी, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनेत किती आरोपींना शिक्षा झाली आहे, याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आलेख पाहिल्यावर पाथर्डी पोलिस ठाण्याची तालुक्यात कायदा सुव्यवस्थेवर किती पकड आहे हे लक्षात येईल. यात काही अपवाद पोलिस कर्मचारी अनेक वर्षांपासून म्हणजेच कार्यकाळ संपला तरी, एकाच ठिकाणी का?  ते स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने नेमकं कोणत्या कारणास्तव पाथर्डीत पोलिस कर्मचारी ठाण मांडून आहेत, अशा पोलिसांच्या बदल्या झाल्या पाहिजेत, अशीही मागणी पाथर्डी तालुक्यातील नागरिकांनी केली. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक आणि मुंबई पोलीस महासंचालक यांनी कायदा सुव्यवस्थेचा विचार करता लक्ष द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तालुक्यातील दगडवाडी येथे रविवारी (दि.१० डिसेंबर २०२३) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ७ ठिकाणी चोरी करून शेतकऱ्यांच्या दारासमोरील शेळ्या व दुचाकी घेऊन पोबारा केला. गावात एकाचवेळी ७ ठिकाणी चोऱ्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, चोरटयांनी रविवारी मध्यरात्री संतोष लक्ष्मण वामन यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी व सुखदेव बबन शिंदे, बाबासाहेब परसराम शिंदे व बाप्पू बबनराव शिंदे यांच्या घरासमोरील प्रत्येकी एक शेळी चोरून नेली. महादेव निवृत्ती कराळे यांचे टेलरिंगचे दुकान फोडून शिवलेले नवीन कपडे व कापड चोरीला गेले आहे. तसेच विनायक यमाजी शिंदे यांचा किराणामाल चोरीला गेला आहे. चोरीचा हा प्रकार पहाटेच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात आला. सकाळी पाथर्डी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सौरभ राजगुरू यांच्यासह श्वानपथक व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते.
चोरीच्या घटनेनंतर पोपट छगन शिंदे यांच्या शेतामध्ये आढळून आलेली एक बेवारस दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडण्याचादेखील चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!