पाथर्डी नवीन पोलिस ठाणे, पोलिस वसाहत कामाचे खा.विखेंच्या हस्ते भूमिपूजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : नुकतेच पाथर्डी नवीन पोलिस ठाणे इमारत व पोलिस वसाहतीच्या कामाचे भूमिपूजन खा.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी
यावेळी आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री तथा जिल्हा बँक अध्यक्ष शिवाजी कर्डिले, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, डिवायएसपी सुनील पाटील, राहुल राजळे, अभय आव्हाड, माणिक खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, सुभाष बर्डे, सुभाष ताठे, संजय बडे, धनंजय बडे पा., विष्णूपंत अकोलकर, अमोल गर्जे, सुनील ओव्हळ, बाळासाहेब गोल्हार, अशोक चोरमले उपस्थित होते.
तसेच यावेळी खा.सुजय विखे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवारकोण असेल, हा चर्चेचा विषय नाही. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जो उमेदवार असेल त्याला निवडून द्या, असे आवाहन केले.दोन दिवसांपूर्वी तालुका दौऱ्यावर आलेल्या आमदार राम शिंदे यांनी आपणही लोकसभा निवडणुकीचे दावेदार असल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर खा.विखे काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.
आमदार मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या पाथर्डी नवीन पोलिस ठाण्याची इमारत व पोलिस वसाहतीच्या कामाचे भूमिपूजन विखे यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री खा.विखे म्हणाले, की जिल्ह्यात कुठेही काही झाले, तरीही माझ्या व कडिले यांच्या नावावर बिल फाटते. राजळे बोलत नाहीत. मात्र, हवे ते काम सहज करून घेतात. सध्या नवरात्र चालू आहे. मी खासदार नसतो, तर कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला नसता, हे शपथेवर सांगतो. येत्या २६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. आगामी काळात ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जास्त कार्यकर्त्यांना या सभेसाठी घेऊन यावे. आभार संतोष मुटकुळे यांनी मानले.