संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- पाथर्डी नगरपरिषद चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेता संघ म्हणून पंचायत समिती इलेव्हन संघ तर उपविजेता संघ म्हणून पाथर्डी पोलीस इलेव्हन संघात ठरला आहे.
पाथर्डी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या भव्य एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत नगरसेवक इलेव्हन,पंचायत समिती कर्माचरी इलेव्हन,नगर परिषद कर्मचारी इलेव्हन,पत्रकार इलेव्हन,वकील इलेव्हन, डॉक्टर इलेव्हन, श्री तिलोक जैन विद्यालय प्राध्यापक इलेव्हन, पोलीस इलेव्हन या आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
पाथर्डी शहरातील विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड ,नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे,श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे,सहसचिव सूरेश कुचेरिया,विश्वस्त धरमचंद गुगळे,प्राचार्य अशोक दौंड,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,विष्णुपंत अकोलकर, नगरसेवक महेश बोरुडे, रमेश गोरे, बजरंग घोडके, नामदेव लबडे, सुनील ओव्हाळ, एकनाथ आटकर, चारुदत्त वाघ, बबन बुचकुल, सुभाष केकाण आदी उपस्थित होते.
बक्षिस वितरण कार्यक्रम प्रसंगी आमदार मोनिका राजळे, सतिष गुगळे, डॉ मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, काकासाहेब शिंदे, धनंजय बडे, संजय किर्तने, सेकाशीबाई गोल्हार, राहुल राजळे, बंडूशेठ बोरुडे, पांडूरंग सोनटक्के, गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे, रवींद्र आरोळी, जमीर आतार, संतोष दहिफळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृत्युंजय गर्जे यांनी केले. सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी केले तर आभार महेश बोरुडे यांनी मानले.
👉-इतर दिवशी पोलीस आपल्या कामात व्यस्त असतात त्यांना आनंद साजरा करता येत नाही. मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी या क्रिकेट स्पर्धेचा दिलखुलास आनंद घेत गाण्यावर जल्लोष साजरा केला. क्रिकेट स्पर्धेमध्ये आमदार मोनिका राजळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पालिकेचे मुख्यधिकारी संतोष लांडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कांयदे, प्रवीण पाटील.