पाथर्डी तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळा बंद करावेत ; मागणीसाठी घंटानाद आंदोलन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

पाथर्डी –  तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅब) तंत्रज्ञ यांच्यावर महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद मुंबई यांचे आदेशानुसार कारवाई करून  व तात्काळ बंद करण्यात यावेत, या मागणीसाठी पाथर्डी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आंदोलनात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, भास्करराव दराडे, भास्करराव कराड, ॲड आत्माराम वांडेकर, प्रा सुनिल पाखरे हे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पाथर्डी तालुक्यातील व पाथर्डी शहरातील अनधिकृत प्रयोगशाळा तात्काळ बंद करून त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा.महाराष्ट्र राज्य पॅरावैद्यक परिषदेचे अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत संपूर्ण राज्यभर दि. 10 मे 2021 रोजी आदेश देण्यात आले होते. मात्र अनेक महिने उलटून देखील अद्याप अशा एकही अनधिकृत प्रयोगशाळा बंद अथवा कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. त्याबाबत कारवाई करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी ,आरोग्य अधिकारी,पोलीस अधिकारी यांचे कार्यालयाकडे प्राप्त देखील आहे. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत वर्तमानपञातून वेळोवेळी आवाज देखील उठविला आहे. कोविड महामारी काळात या अनधिकृत प्रयोगशाळात होणारी रुग्ण तपासणी व निदान रिपोर्ट यांची माहिती आरोग्य विभाग, पोलीस व महसूल विभाग यांना मिळत नव्हती. त्यामुळे सर्वच तालुक्यांमध्ये कक्ष अधिकारी कर्मचारी यांचेसह सामान्य जनतेला कोरोणा फैलावाचा त्रास झाला आहे. त्यामुळे या कोविड आजार सर्वत्र पसरला होता. मागील तीन दिवसांपूर्वी संगमनेर येथे काही अनधिकृत प्रयोगशाळांवर बोगस डॉक्टर म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत, असे समजते. या जनसामान्यांच्या आरोग्यप्रश्नाबाबत पाथर्डी शहर व तालुक्यातील 107 ग्रामपंचायत अंतर्गतच्या हद्दीतील अनधिकृत प्रयोगशाळा चालकांवर  फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्या प्रयोगशाळा सील करण्यात यावेत. सर्वसामान्य जनतेची होणारी लूट थांबवावी आजही अशा अनधिकृत प्रयोगशाळा या नागरिकांची खुप मोठी आर्थिक लूट करत आहेत. अशा प्रकारे बोगस प्रयोगशाळा तालुक्यामध्ये सुमारे 40ते 50 असून त्यांना कोणी परवानगी दिली त्यांचे तंत्रज्ञ कोण आहेत. त्या कशाप्रकारे जनतेची लूट करतात आजपर्यंत त्यांनी संबंधित विभागाकडे नोंदणी का केली नाही. त्यांनी रीतसर परवानग्या का घेतल्या नाही. पालिकेने व संबधित आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांनी त्यांना ना हरकत प्रमाणपत्र कसे दिले. आजपर्यंत या प्रयोगशाळा कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत. यासर्व बाबींची चौकशी करून यांचेवर तात्काळ कारवाई करावी. आपण या तक्रार अर्जावर काहीएक कारवाई केली नाही,असे म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!