पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : विरोधकांचा निवडणुकीवर बहिष्कार !, १७ जागांसाठी ५५ उमेदवारांचे विविध मतदारसंघातून ६१ उमेदवारी अर्ज
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : (सोमराज बडे) तालुका खरेदी विक्री संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जागांसाठी ५५ उमेदवारांनी विविध मतदारसंघातून ६१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात विद्यमान १७ पैकी १० संचालकांनी पुन्हा अर्ज दाखल केले आहे. यात अंधारात तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी मोठी खेळी केली असून, विरोधकांना संघात सत्ताच मिळू नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी व्युहरचना केल्याचा आरोप करीत, विरोधकांनी संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्या आहे. यामुळेच निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व घडामोडींकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. खरेदी विक्री संघाची निवडणूक येत्या दि.२८ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला टप्पा आज (२९) रोजी संपन्न झाला.सोसायटी मतदार संघासाठी (२०) व्यक्तिगत (१७) अनुसूचित जाती (४) महिला (५) इतर मागासवर्ग (९) भटक्या विमुक्त (५) अशाप्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यानंतर १ जानेवारी रोजी छाननी होऊन दि. १६ जानेवारी पर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. यामुळे १६ तारखेला जरी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी,विरोधी महाविकास आघाडीने यापूर्वीच मतदार यादीची होळी करत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.यासाठी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरलेल्या काहींची मनधरणी आमदार राजळे यांना करावी लागणार आहे.आमदार राजळे यांचे विश्वासू असणारे संघाचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब अकोलकर तसेच संचालक असणारे व मागील सहा महिन्यापूर्वी बाजार समितीचे सभापती झालेले सुभाष बर्डे या दोघांनी मात्र अर्ज दाखल केलेला नाही.