संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – पागोरी पिंपळगांव, कोरडगांव व खरवंडी कासार परिसरातील गावे जिरायत पट्टयात येत असून, या परिसरात मुळा धरणाच्या कालव्याचे पाणी यावे, यासाठी आपण शेतकऱ्यांना जागृत करत आहे. लवकरच या परिसरातील गावांचा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. समिती शिष्टमंडळासह जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या परिसरातील गावांना मुळा धरणाचे पाणी मिळण्यासाठी लक्ष वेधणार आहोत, अशी माहिती राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे अहमदनगर दक्षिण जिल्हा सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री ढाकणे यांनी म्हटले की, मुळा धरणाचे पाणी खरं तर प्रभू पिंपरी, पागोरी पिंपळगांव, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, लोखंडवाडी, माळेगांव, वांळुज, वसुजळगांव, सोमठाणे नलवडे, भुतेटाकळी, कोरडगांव, औरंगपुर, जिरेवाडी, कळसपिंपरी, तोंडोळी, सोनोशी, दैत्यनांदुर, येळी, बडेवाडी, काटेवाडी,खरवंडीकासार, मुंगसवाडे, एकनाथवाडी, भालगांव व खरमाटवाडी या गावांना पाणी मिळण्यास काहीच हारकत नव्हती. परंतु दुर्देवाने विकासाचे राजकारण झाले नाही. शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असणाऱ्या या प्रश्नाकडे कोणी लक्ष घातले नाही. यामुळे ही गांवे विकासापासून वंचित राहिली. मुळा धरणाचे पाणी सुसरे व साकेगांवला आले तेच कालव्याचे पाणी पुर्वभगातील शेवटच्या लोकांपर्यंत नेण्यासाठी या अगोधरच प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु हा प्रश्न जाणुनबुजून बाजुला ठेवून ही गावे विकासापासून दुर्लक्षित ठेवण्यात आले.उत्पन्नाचे कोणतेही दुसरे साधन नसल्यामुळे नाईलास्तव येथील शेतकऱ्यांना जमीन असून देखील पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्षे ऊसतोड करावी लागत असल्यामुळे हा परिसर ऊसतोड कामगारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. नेमके हेच मला शेतकरी पुत्र आसल्यामुळे अनेक दिवसापासुन खटकले जाते. मुळा धरणाचे पाणी कालव्याद्वारे पुर्वभागाच्या शेवट टोकाप्रर्यंत मिळण्यासाठी आपण शेतकरीपुत्र असल्यामुळे जातीने लक्ष घालणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी परिसरातील गावांतील शेतकऱ्यांना जागृत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवून प्रसंगी आंदोलने करुन महाराष्ट्र सरकारचे परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या वतीने लक्ष वेदणार आहोत, असे पत्रकात श्री ढाकणे यांनी म्हटले आहे.