पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे : डॉ.विखे पा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे : डॉ.विखे पा.

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची सेवा करण्याचे दायित्व खांद्यावर घेतले आहे.आपली भारतामाता मोदींच्या भक्तीयोगातून, कर्मयोगातून, आणि ज्ञानयोगातून पुन्हा एकदा विश्वरूपदावर आरूढ झाल्या शिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. यामुळे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. ते जामखेड येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.
अहिल्यानगर लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून डॉ. सुजय विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण केलेल्या विकास कामे घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. जामखेड मधील मुंगेवाडी येथे मंगळवारी महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. राम शिंदे, रवी सुर्वसे, बाळासाहेब भोसले, योगेश सुर्वसे, राजू भोसले, अण्णा सुर्वसे यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्व, कार्यशैली निर्णयक्षमता, दूरदृष्टी,विकासाचा ध्यास आणि देशाप्रती असलेली कळकळ देशाने पाहिली आहे. यामुळे तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान पदाची धुरा सांभाळण्याची संधी जनतेकडून दिली जाणार आहे. मोदींची तिसऱ्या पर्वाकडे दमदार वाटचाल सुरू आहे. त्याचा आपल्याला हिस्सा व्हायचा आहे. असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
यावेळी सभेला उपस्थित असणारे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, खासदार डॉ. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कसर सोडली नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहचविला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरूणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यातील दळण वळणाच्या सेवा सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोगार देण्याचे काम केले आहे. त्यांनी जिल्ह्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक निधी आणण्याचे काम केले. यामुळे असा खासदार येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करेल. यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे गरजचे आहे. असे आवाहन त्यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!