नेप्ती नाका चौक परिसरातील अंतर्गत ड्रेनेज लाईन व रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

नेप्ती नाका चौक परिसरातील अंतर्गत ड्रेनेज लाईन व रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ
सर्वांच्या समन्वयातून प्रभागाचा सर्वांगिण विकास -गणेश कवडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –  प्रभागातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करुन देत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याचबरोबर सभापती असताना प्रभागाच्या विकासात भर टाकणारी  कामे केली व काही सुरु आहेत. नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्याचे प्रश्न सुटावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. नागरिकांच्या सहकार्याने प्रत्येक भागात चांगली कामे झाल्याचे समाधान आहे. प्रभागातील अनेक कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने पुर्ण होतील. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध असून, नागरिकांनीही आपल्या भागातील कामांसाठी पाठपुरावा करावा, सर्वांच्या एकत्रित समन्वयातून प्रभागाचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी केले.


प्रभाग क्र.13 मधील नेप्ती नाका चौक परिसरातील अंतर्गत ड्रेनेज लाईन व रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक अशोक देशमुख यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी माजी सभापती गणेश कवडे, निलेश गावडे, प्रकाश तांबोळी, किशोर देवकर, विजय डोळसे, राजेंद्र कराळे, केतन खताडे, अंबिका नालकोटी, दगडाबाई परदेशी, मिना डोळसे, साधना डोळसे, भारती पाचारणे, संगिता बोरुडे, शितल नवगिरे, संगीता खताडे, परवीन बागवान आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अशोक देशमुख म्हणाले, परिसरातील कामांसाठी नगरसेवक गणेश कवडे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अनेक कामे झाली आहेत. नागरिकांनी सोयी-सुविधा देण्यासाठी कायम तत्पर असतात. आज शुभारंभ होत असलेल्या ड्रेनेज व कॉक्रीटीकरणामुळे परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहेत. कार्यक्षम नगरसेवक म्हणून गणेश कवडे हे कार्यरत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गावडे यांनी केले तर प्रकाश तांबोळी यांनी आभार मानले.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!