नवी दिल्ली, 28 मे 2021
‘नॅशनल एआय पोर्टल (https://indiaai.gov.in)’ ने 28 मे 2021 रोजी आपला पहिला वर्धापन दिन साजरा केला ,आभासी माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला सुमारे 400 मान्यवर उपस्थित होते. नॅशनल एआय पोर्टल हा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग (एनजीडी) आणि नॅसकॉम यांचा संयुक्त उपक्रम आहे. भारताशी AI संबंधित बातम्या, मुद्दे, लेख, कार्यक्रम आणि उपक्रम इ.चे मध्यवर्ती केंद्र म्हणून एआय पोर्टल कार्य करते. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान , विधी आणि न्याय तसेच दूरसंचार मंत्री श्री रविशंकर प्रसाद यांनी 30 मे 2020 रोजी हे पोर्टल सुरू केले.
या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये उद्घाटन, चर्चा सत्र आणि ‘एआय पे चर्चा’ आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय ई-प्रशासन विभाग, नॅसकॉम आणि माहिती भागीदार इन्फोसिसच्या प्रमुख प्रतिनिधींनी, भारत जागतिक स्तरावर इंडियाआय चे नेतृत्व कशाप्रकारे करू शकतो आणि एआयकडून मिळालेल्या विश्वसनीय तोडग्यांची अंमलबजावणी करण्याच्या कल्पनांचा शोध कसा घेता येईल यावर चर्चा आयोजित केली होती.
अधिक माहिती ‘राष्ट्रीय एआय पोर्टल’ वर उपलब्ध आहे. https://indiaai.gov.in या संकेतस्थळाद्वारे या पोर्टलवर जाता येईल.