नूतन चेअरमन राजेंद्र अगरवाल व व्हा.चेअरमन दीप्ती गांधी संधीचे सोने करतील : सुधीर मेहता


👉विश्वास निर्माण करून कर्ज वसुली हेच मोठे आव्हान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
नूतन चेअरमन राजेंद्र आगरवाल आणि व्हाईस चेअरमन सौ.दीप्ती गांधी यांना केवळ नेतृत्वाची संधीच सभासदांनी दिली़ नाहीये, तर 111 वर्षांच्या वैभवशाली अर्बन बँकेला पूर्नवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी सभासदांनी नूतन संचालक मंडळावर सोपवली आहे. सर्वानी साथ दिल्यास ते बँकेच्या भवितव्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल, असे प्रतिपादन नवनीत विचार मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी चेअरमन राजेंद्र अगरवाल व सौ.दीप्ती गांधी आणि नुतन संचालक मंडळाचे अभिनंदन करताना व्यक्त केले.

बचाव समितीने अनेक वर्षे वातावरण तापवले, प्रचंड तक्रारी केल्या, बँकेची निवडणूक त्यांनीच लावली, अशी चर्चा होती. बिनविरोध निवडणुकीसाठी त्यांनी प्रयत्न केले;मात्र बिनविरोध होणे शक्यच नव्हते आणि अखेर शेवटच्या दिवशी मात्र बचाव समितीने संपूर्ण माघार घेतली. त्यामुळे निवडणुक एकतर्फीच झाली आणि आरोप प्रत्यारोप बदनामी टळली,  कटुता सुद्धा टाळली. आता हेच वातावरण पुढील काळात ठेवावे लागेल आणि यात सत्ताधारी-विरोधक दोघांनाही जबाबदारीने वागावे लागेल. सत्ताधारी सहकार मंडळांवर यात मोठी जबाबदारी असेल आणि थकित कर्ज वसुली, एनपीए असंतुलन,  एकुणातच बँकेच्या कारभारात अगरवाल – गांधी यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. हजारो कर्मचारी, ठेवीदार, सभासद एकूणच बँकेचे भवितव्य अबाधित राखण्यात राजेंद्र आगरवाल आणि दीप्ती गांधी यांना यश मिळावे, अशीच नवनीत विचार मंचची अपेक्षा असल्याचे सुधीर मेहता  म्हणाले. चेअरमन राजेंद्र आगरवाल यांना त्यासाठी पूर्ण सहकार्य असेल असेही ते म्हणाले.
खरे तर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमला, अचानक प्रशासक माघारी बोलावला, काय केले प्रशासनाने दोन वर्षात, कर्ज वसुली नाही, ठेवी वाढल्या नाहीत, कर्जदाराने आम्ही कर्ज घेतलेच नाही म्हणायचे, काही विरोधक कर्जदारांना साथ देत होते आणि प्रशासनाने त्यांचीच री ओढली. तरीही निवडणूक होऊ नये, निवडणुकीचा खर्च बँकेला पेलवणार नाही, अशी भूमिका नवनीत विचार मंचने जाहीरपणे घेऊन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे प्रयत्न केले होते. बँकेत द्वेषाचे राजकारण थांबवा अशीच विनंती आपण दोन्ही गटांना केली होती. आता बँक वाचवायचे असेल तर खूप कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. लक्षात घ्या प्रशासक मागे बोलावून रिझर्व्ह बँकेने जबाबदारी नूतन संचालकवर टाकली आहे. आता सहकार पॅनलवर  ऐतिहासिक जबाबदारी आली आहे. अन् सर्व राजकारण-गट बाजूला ठेऊन अगरवाल यांना नेतृत्व करावे लागणार आहे. भैय्या गंधे भाजपाचे अध्यक्ष आहेत. अजय बोरा, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, दिनेश कटारिया यांनी स्व. दिलीप गांधी यांचे समवेत काम केले आहे. राहुल जामगावकर एम.बी.ए.फायनान्स आहेत.
चेअरमन अगरवाल यांची पाटी कोरी  आहे. नव्या अन् जुन्या संचालकांसह  गांधी यांना विरोधक सभासद, कर्मचारी, कर्जदार, ठेवीदारांमध्ये विश्वास निर्माण केला तर या संधीचे सोने होईल,असे सुधीर मेहता यांनी म्हंटले आहे. कर्जवसुली करताना कठोर व्हा, भेदभाव पक्षपात नको आणि चुकीचे नियमबाह्य काम टाळताना उधळपट्टी थांबवली तर यश तुमचेच असेल, असे सुधीर मेहता यांनी पुन्हा पुन्हा म्हंटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!