👉उत्कृष्ट कामगिरी करून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा उंचावणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना जिल्हा पोलीस मुख्यालय येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये नाशिक परिषदचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनी प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,अप्पर पोलीस निरीक्षक प्रशांत खैरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम, यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
सन्मानित केलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश विठ्ठलराव आहेर, सपोनि हेमंत शिवाजी थोरात,पोसई तुषार छबु धाकराव,पोसई सोपान रमेश गोरे,सहाय्यक फौजदार भाऊसाहेब गोविंद काळे, पोहेकॉ विजयकुमार बाळासाहेब वेठेकर ,पोहेकॉ दत्तात्रय तान्हाजी हिंगडे,पोहेकॉ सुनिल सिताराम चव्हाण ,पोहेकॉ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे,पोहेकॉ संदिप कचरु पवार, पोना विजय महादेव ठोंबरे,पोहेकॉ सुरेश चंद्रकांत माळी, पोना सचिन दत्तात्रय आडबल,पोकॉ विजय सिध्दार्थ धनेधर,मपोना भाग्यश्री गंगाधर भिटे .तसेच सायबर पोलीस स्टेशनचे उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अंमलदार पोना फुरकान अब्दुल मुजिब शेख, पोकॉ प्रशांत राम राठोड यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यावेळी म्हणाले की आपली कामगिरी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या दृष्टीने अभिमानास्पद असून आपण यापुढे देखील दैदीप्यमान समाज/ देश पोलीस दलाची प्रतिमा उंचावत ठेवाल अशी अपेक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,अप्पर पोलीस निरीक्षक प्रशांत खैरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.