संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत ः तालुक्यातील राशीन येथील नातेवाईकाच्या घरी चोरी करणार्यास मुद्देमालासह अटक करण्याची कारवाई नगर एलसीबी टिमने केली आहे. प्रशांत मानसिंग बाचकर (वय 27, रा. सरडेवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर एलसीबीचे अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, रोहित मिसाळ, आकाश काळे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे व चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अशी की, दि. 12 जून 2024 रोजी कुटूंबियासह बाहेरगांवी गेलेले असतांना वयस्कर आई-वडील घरी होते. त्यावेळी त्यांच्या नात्यातील प्रशांत बाचकर हा वडीलांना औषध देण्यासाठी आला असता त्याने घरातील 52 हजार 500 रुपये किंमतीचे 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले, या गणपत पोपट कायगुडे (रा.कायगुडेवस्ती, राशिन, ता. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गु.र.नं.411/2024 भादविक 380 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.