संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- संत नागेबाबा मल्टिस्टेट च्या केडगाव शाखा 9 व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे तज्ञ संचालक सीए अमित फिरोदिया व अनेक मान्यवर सभासद यांच्या उपस्थितीत विचारधन दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला.
प्रास्ताविकात संस्थेचे रिजनल ऑफिसर अक्षय काळे म्हणाले की, नागेबाबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडूभाऊ काळे साहेब यांच्या संकल्पनेतून विचारधन चळवळ चालवली जाते. त्याचाच एक भाग या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर एक सुंदर विचार टाकलेला असून त्यामुळे आजपर्यंत अनेकांना एक सकारात्मक ऊर्जा मिळते. धनच नाही तर विचारधन देणारी ही संस्था असून अनेक सामाजिक काम संस्थेमार्फत केले जातात. यामध्ये नागेबाबा अन्नपूर्णा योजना यात सभासद याना नगर शहरात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर मोफत डब्बे पुरवले जातात, अवघ्या तीनशे रुपयांमध्ये दहा लाख अपघाती विमा अश्या अनेक योजनां संस्था काम करत असून 6 जिल्ह्यात 56 शाखा व सतराशे कोटी रुपये व्यवसाय असल्याचे सांगितले.
यावेळी जेष्ठ सभासद गिताराम शिंदे गुरुजी, राधाकृष्ण ठुबे सर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्वागत व सूत्रसंचालन सौ.शिल्पा लव्हारे यांनी केली तर संस्थेचे तज्ञ संचालक अमित फिरोदिया यांनी आभार मानले.
यावेळी ॲड कचरे, योगेश बाफना, डॉ.राजेंद्र सासवडे, सौ. व श्री बोकरिया, बाळासाहेब ढेपे, प्रभाकर गोसावी, सतीश पवार, सौ. वंदना पाखरे, वृषाली दिवटे, पुष्प भिंगारदिवे, उषा दराडे, बेबी रेपाळे, गणेश कोतकर, सूर्यभान कोतकर, व शाखेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.
दरम्यान नितीन घोडके , संतोष यादव, पालवे साहेब यांनी बुके देऊन शुभेच्छा दिल्या.