नागरदेवळे सोसायटीच्या नुतन संचालकांचा भिंगार बँकेच्यावतीने सत्कार

नूतन संचालक शेेतकर्‍यांच्या प्रगतीस हातभार लावतील – शरद झोडगे

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :-
ग्रामीण भागात विविध कार्यकारी सोसायटी शेतकर्‍यांची कामधेनू म्हणून ओळखली जाते. शेतकर्‍यांचे आर्थिक व्यवस्थापन, कर्ज, शासकीय अनुदान, कर्ज माफी यामुळे या सोसायटीस महत्व आहे. शेतकर्‍यांच्या प्रगतीस हातभार लावणार्‍या सोसायटीतील संचालक मंडळ हे शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणारे व अनुभवी असणे आवश्यक असते. यासाठी निवडणुक बिनविरोधी करुन वेळ आणि पैसे वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांच्या अडमुठेपणामुळे निवडून लादली गेली. परंतु सुज्ञ सभासदांनी आमच्या नागेश्वर पॅनेलवर विश्वास दाखवत 11-2 ने उमेदवारांनी विजयी केले. सभासदांच्या विश्वास पात्र राहून त्यांची प्रगती साधू, असे सांगून भिंगार बँकेने परिसरातील सर्वसामान्यांची आर्थिक पत निर्माण केली आहे. सर्व क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची बँकेची भुमिका ही समाज हिताची असल्याचे प्रतिपादन नागेश्वर पॅनेलचे प्रमुख जि.प.सदस्य शरद झोडगे यांनी केले.

     नागरदेवळे सोसायटी निवडणुकीत नागेश्वर पॅनेलने यश संपादन केल्याबद्दल भिंगार बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेअरमन अनिलराव झोडगे, व्हाईस चेअरमन किसन चौधरी, नागेश्वर पॅनेलचे प्रमुख जि.प.सदस्य शरद झोडगे, श्रीकृष्ण धाडगे, हरिभाऊ धाडगे, नंदकुमार दळवी, समीर लोंढे, सतीश धाडगे, बाळासाहेब धाडगे, योगेश धाडगे, काळूराम पाखरे, सुषमा शेलार, संगीता बिने आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी चेअरमन अनिलराव झोडगे म्हणाले, सर्वसामान्य, शेतकरी यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सोसायटी, पतसंस्था, बँका या प्रयत्नशील असतात. चांगले काम करणार्‍या संचालकांच्या पाठिशी सभासदही उभे राहत असतात. नागेश्वर पॅनेलचे प्रमुख जि.प.सदस्य शरदराव झोडगे यांच्या नेतृत्वाखाली नागरदेवळे सोसायटीत दणदणित विजय मिळविला, ही कौतुकास्पद बाब आहे. नूतन संचालक पदाच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांची प्रगती साधतील, असा विश्वास व्यक्त केला.

     यावेळी बँकेचे रमेश परभाणे, नाथाजी राऊत, राजेंद्र पतके, कैलास खरपुडे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, तिलोत्तमा करांडे, नामदेव लंगोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांनी नागेश्वर पॅनेलचे प्रमुख शरद झोडगे यांच्या कार्याचा उल्लेख करुन अभिनंदन केले. सूत्रसंचालन रमेश परभाणे यांनी केले तर शशिकांत महाजन यांनी आभार मानले. यावेळी महेश झोडगे, शिवाजी बनकर, निखिल शेलार, सुशिल कदम, सुरेश बनकर, अनिल पाखरे, संजय दळवी, राकेश ताठे, संतोष धाडगे, अविनाश धाडगे, सोमा धाडगे, हसीम शेख आदि उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!