नागरदेवळे सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक : श्री नागेश्वर तर बेलेश्वर पॅनलमध्ये रस्सीखेच


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
नगर तालुक्यातील नागरदेवळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीची होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा श्री नागेश्वर तर बेलेश्वर या दोन्ही पॅनलने प्रत्येकी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. या उमेदवारांचे भवितव्य सोसायटीचे ३१८ मतदार ठरविणार असून, या मतदारांपैकी १२ ते १४ मतदार मयत आहेत. यामुळे उर्वरित मतदारांनी आपल्याचा उमेदवारांना निवडून दिले पाहिजे, यासाठी दोन्ही पॅनलने मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे. या रस्सीखेचीत कोणता पॅनलचा उमेदवार निवडून आला, हे पाहण्यासाठीच दोन्ही पॅनल उमेदवारांचे भवितव्य येत्या मंगळवारी दि.२६ एप्रिलला मतपेटी बंद होईल. तत्पूर्वी बेलेश्वर पॅनलने भर उन्हाळ्यात आपली छञी  उघडून मतदारांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे श्री नागेश्वर पॅनलनेही आपला नारळ मतदारांपर्यत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला आहे. यामुळे दोन्ही पॅनेल उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु झाली आहे.


नागरदेवळे सेवा सोसायटी निवडणुकीत श्री नागेश्वर व बेलेश्वर या दोन्ही पॅनलमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. दोन्हीही पॅनलने नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. निवडणुकीत बेलेश्वर पॅनलने आपल्या उमेदवार फलकावर उमेदवारांची नावे,  छञी चिन्हाबरोबरच माजीमंञी शिवाजी कर्डीले यांचेही छायाचित्र दाखविण्यात आले आहे. यामुळे हा पॅनल माजीमंञी शिवाजी कर्डीले यांचाच आहे हे स्पष्ट, तर दुसरीकडे श्री नागेश्वर पॅनल उमेदवारी फलकावर फक्त नारळ चिन्ह दाखवून उमेदवारांची नावे. पण हा श्री नागेश्वर पॅनल उर्जामंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचाच आहे,अशीही चर्चा आहे. यात बेलेश्वर पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच राम पानमळकर करत आहे. श्री नागेश्वर पॅनेलचे नेतृत्व पॅनेलचे उमेदवार तथा माजी जि.प.सदस्य शरदराव झोडगे हे करीत आहेत. दोन्हीही पॅनेलचे नेतृत्व राजकारणातील मुरबी खिलडू आहेत. यामुळे येत्या काळात राञीस खेळ चाले, या काव्यापंगती सध्या तरी नागरदेवळे परिसरात पाहण्यास मिळत आहे.


दोन्ही पॅनेलचे उमेदवार याप्रमाणे: बेलेश्वर पॅनेलचे उमेदवार याप्रमाणे जयवंत दत्ताञय गांधले, किरण बापूराव दळवी, ठकनराव गोंविद धाडगे, कमल मल्हारी पानमळकर, बाळासाहेब फकिरा बोरबने, राजेंद्र अशोक बोरूडे, बापूसाहेब सखाराम शिंदे, मुक्ताबाई बापूसाहेब शिंदे, राजश्री संजय शिंदे (महिला राखीव), शिला दत्ताञय शिंदे, आदिनाथ लक्ष्मण शेलार (इतर मागास प्रवर्ग), दादु भागुजी पाखरे ( अनुसूचित जमाती) ही सर्व उमेदवार छञी चिन्हावर उभी आहेत. तर दुस-या श्री नागेश्वर पॅनेलकडून शरदराव मधुकर झोडगे, नंदकुमार विश्वनाथ दळवी, बाळासाहेब मल्हारी धाडगे, श्रीकृष्ण मल्हारी धाडगे, सतिष काशिनाथ धाडगे, हरिभाऊ मल्हारी धाडगे, समीर गंगाधर लोंढे, इस्माईल अब्दुल शेख, सौ.संगिता राजु बिने (महिला राखीव), सौ.सुषमा हनुमान शेलार (महिला राखीव), योगेश दत्ताञय धाडगे (इतर मागास प्रवर्ग), काळुराम लक्ष्मण पाखरे (अनुसूचित जाती जमाती) ही सर्व उमेदवार नारळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!