संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नागरदेवळे-भिंगार येथे शुक्लेश्र्वर मंदिरानजिक सुरु असलेल्या ‘श्री रामकथा’ या सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमाचा आयोजकांनी नागरदेवळेफाटा येथे उभारण्यात आलेल्या कमानीवरील फलक गुरूवारी (दि.२६) च्या राञी फाडण्यात आल्याची घटना घडली आहे.
नागरदेवळे-भिंगार येथे महेश झोडगे मिञमंडळीकडून ‘श्री रामकथा’ हा धार्मिक कार्यक्रम सोमवार दि.२३ मे पासून मोठ्या उत्साहाने सुरु आहे, या कार्यक्रमास भाविकगण मोठ्या संख्येने दररोज सायंकाळी उपस्थित राहत आहे. या अशा धार्मिक कार्यक्रमाची आयोजकांनी बु-हाणनगररोडवर नागरदेवळेफाटा, देवीमंदिरासमोर श्री रामकथा सांगणारे समाधानजी महाराज शर्मा व आयोजक महेशभाऊ झोडगे यांच्या छायाचित्रासह कार्यक्रमाची माहिती असणारी कमान उभारण्यात आली होती. परंतु या कमानीवरील शर्मा महाराज व महेश झोडगे यांच्या छायाचित्रासह तिन्ही बाजूंनी अज्ञातांनी कमानीवर चढून फाडण्यात आला आहे. हे गैरकृत्य अज्ञातांनी गुरुवारी रात्री केले आहे. हा प्रकार महेशभाऊ झोडगे मिञमंडळाच्या कार्यकर्तेस समजल्यावर अनेकांजण घटनास्थळी जमा झाले होते.
धार्मिक कार्यक्रमाची कमान फाडली गेल्यानी आयोजक महेश झोडगे यांच्यासह महेशभाऊ झोडगे मिञमंडळीकडून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
👉असे कृत्य करणा-यास देव सद् बुद्धी द्यावो : महेशभाऊ झोडगे
‘श्री रामकथा’ या धार्मिक कार्यक्रमाच्या कमानीचा फलक दुषित भावनाने फाडणे चुकीचे आहे. आम्ही लोकहितासाठी सामाजिक, धार्मिक कार्यक्रम करणारे लोक आहोत, यामुळे गुरुवारी रात्री कमान फाडणा-याबाबत आमची कोणतीही तक्रार नाही. या कार्यक्रमाचा फलक फाडणारा जो कोणी असेल, त्याने मोठी चूक केली आहे, त्याच्या कृत्याची श्री राम हे फळ देतीलच. हा कार्यक्रम लोकांचा आहे, आम्ही फक्त निमीत्तमात्र आहोत. परंतु देवास प्रार्थना करता की, ज्यांनी ही ‘श्री रामकथा’ कमान फाडली, त्या महाशयांना सद् बुद्धी द्या. आम्ही समाजासाठी काम करणारे आहोत. अशी प्रतिक्रिया ‘श्री रामकथा’चे आयोजक महेशभाऊ झोडगे यांनी दिली आहे.