संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत नुकतेच नव्याने झालेल्या घटनाक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वपूर्ण असणारे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपल्या सहकाऱ्यांबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर गेली. यानंतर भाजपाने श्री पवार यांना थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदही दिलं. या घडामोडीत राज्यातील अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अडचण निर्माण झाली. परंतु केंद्रात व राज्यात आज प्राबल्य असलेल्या भाजपा- शिंदे गट शिवसेनेच्या सरकार मध्ये जाताचा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर येथील मा.आ.अरुणकाका जगताप यांनी थेट मुंबई येथे जाऊन नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुनीलजी तटकरे, रामराजे निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.