नगर शहरात जुगार अड्ड्यावर छापा;२४ जुगारी ताब्यात, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबी टिम’ची कारवाई

नगर शहरात जुगार अड्ड्यावर छापा;२४ जुगारी ताब्यात, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील कोठला येथील जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून २४ जुगा-यांना पकडण्यात आले. या छाप्यात ७ लाख ३६ हजार ६४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.


गफार वजीर शेख (वय ६०, रा. अलमीन ग्राऊंड शेजारी मुकूंदनगर अहमदनगर), राजू मेहबुब शेख (वय ४८, रा. प्रेमदान हाडको अहमदनगर, संभाजी महादेव निस्ताने (वय ५०, रा. सर्जेपुरा अहमदनगर), ऍ़गस्टीन जॉर्ज गोनसालविस (वय ३८, रा. तारकपुर अहमदनगर), इमाम इब्राहिम पठाण (वय ६०, रा. नेप्तीरोड केडगांव अहमदनगर), बाळासाहेब सुभाष खटके (वय ५०, रा. कायनेटीक चौक अहमदनगर), किरण प्रभाकर पानपाटील (वय५२, रा. सदरबाजार भिंगार अहमदनगर), बाळासाहेब एकनाथ चेंडवाल (वय ५४, रा. गुंजाळी ता. राहुरी), किरण भगतराम बहुगूणा (वय ४५, रा. फलटण चौकी जवळ कोठला अहमदनगर), बालाजी कृष्णहरी बिजा (वय ४५, रा. सावेडी अहमदनगर), अरबाज खलील शेख (वय२४, रा. कोठला अहमदनगर), सुल्तान हनिफ शेख (वय २९, रा. कोठला अहमदनगर), जिशान राजू इनामदार (वय३२, रा. मुकूंदनगर अहमदनगर), निसार अजिज शेख (वय६०, रा. इदगाह मैदान ता. शेवगांव), जाहिद रऊफ सय्यद (वय १९, रा. कोठला अहमदनगर), राहुल रंगनाथ आल्हाट (वय ३७, रा. पिंपळगांव उजैन ता. नगर), छबुराव बाबुराव येळवंडे (वय ७०, रा. घोडेगांव ता. नेवासा), अनिल नारायण फुलारी (वय ४३, रा. दर्गादायरा मुकूंदनगर अहमदनगर), तबरेज इसाक शेख (वय ४२, रा. दर्गादायरा मुकूंदनगर अहमदनगर), रफिक गुलाब शेख (वय ६३, रा. दर्गादायरा मुकूंदनगर अहमदनगर), अख्तर जानमहंमद शेख (वय ४५, रा. बाबाबंगाली झेंडीगेट अहमदनगर), इस्माईल हसन पठाण (वय ६४, रा. गजराजनगर बु-हाणनगर अहमदनगर), अर्शद आयुब शेख (वय ३१, रा. मुकूंदनगर अहमदनगर), शुभम विजय देवळालीकर ( वय २७, रा. कराचीवाला नगर, अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोसई तुषार धाकराव, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना विजय ठोंबरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, रविंद्र घुंगासे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, मच्छिंद्र बर्डे, चापोहेकॉ संभाजी कोतकर व चापोकॉ अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
एलसीबी टिम’ला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाण जाऊन खात्री करता काहीजण दोन खोलीत गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेऊन पैशावर हारजीतीचा तिरट जुगार खेळताना दिसले. पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला व तेथे बसलेल्यांना पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांचे नाव गांव विचारले असता बसलेल्यांनी त्यांची नावे सांगितली. पकडण्यात आलेल्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत ७ लाख ३६ हजार ६४० रुपये किंमतीची रोख रक्कम, एक स्कॉर्पिओ गाडी, विविध प्रकारचे १९ मोबाईल फोन व जुगाराची साधने असा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मजुकाक १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही तोफखाना पोलीस करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!