संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- अहमदनगर भाजपा युवा मोर्चा च्या वतीने विद्यापीठ सुधारणा कायद्याला विरोध दर्शविल्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक ( काळे विधेयक ) महविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले. या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या, विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा ,म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का ? हा प्रश्न विद्यार्थी विचारात आहेत.
या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन १० लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहे.
नगर जिल्ह्यातून या कायद्याला विरोध करणारे पत्र मोठ्या प्रमाणावर पाठविण्यास सुरुवात केली आहे…
सदर काळा कायदा रद्द झाला नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाणार आहे.
तसेच ज्यांचा या काळया कायद्याला विरोध आहे त्यांनी 7745050111 या क्रमांकावर मिस् कॉल द्यावा असेही आवाहन करीत आहोत…..
यावेळी उपस्थित भा.ज.यु.मो प्रदेश उपाध्यक्ष तथा शहर युवा मोर्चाचे प्रभारी श्री.सचिन तांबे , शहर जिल्हाध्यक्ष श्री.महेश तवले , सरचिटणीस अमोल निस्ताने , मल्हार गंधे , उपाध्यक्ष राकेश भाकरे , अभिजित शिंदे , सिद्धेश नाकाडे , युवती प्रमुख गुणाली ताई मुथा , मंडल अध्यक्ष किशोर कटोरे, चिटणीस यश शर्मा , सुजित खरमाळे , वैभव झोटिंग , विद्यार्थी आघाडी सयोंजक आकाश सोनवणे , सोशल मीडिया आदेश गायकवाड , पियुष संचेती , अभिषेक वराळे , कार्तिक तगारे , योगेश मुथा , सनी चेमटे , रमेश थडाकिया , डॉ मयूर चव्हाण , साहिल शेख आदी उपस्थित