ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस नगर तालुका सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकारातून नगर तालुक्यातील भूमीहीन असणारे युवकांना नगर तहसील कार्यालयात भूमीहीन असल्याबाबतची दाखले देण्यात आली.
आदिवासी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस नगर तालुका सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष राम चव्हाण यांच्या पुढाकारातून नगर तालुक्यातील अनेक दिनदुबळ्यांना सरकारी योजना मिळाव्यात, या हेतूने भूमीहीन दाखले देण्यात आली आहेत.
दरम्यान भूमीहीन असल्याबाबतची दाखले नगर तालुक्याचे नायब तहसीलदार माधव गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. भूमीहीन दाखल मिळाल्याने उपस्थित तरुणांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे नगर तालुका कार्यकारणी पदाधिकारी अक्षय चव्हाण, सावता चव्हाण, महेश चव्हाण, राहुल चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, बाळू काळे, कुणाला काळे आदिंसह युवक उपस्थित होते.
यावेळी राम चव्हाण म्हणाले की, नगर तहसीलदार कार्यालयाकडून संबंधितांना देण्यात आलेल्या भूमीहीन असलेबाबतच्या दाखल्यामध्ये अहमदनगर तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली. यानंतर संबंधिताच्या नावावर नगर तालुक्यात कुठेही शेतजमिन अथवा भुखंड नाही. अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील वडिलोपार्जित कोणत्याही व्यक्तीकडे शेतजमिन नाही असे सर्व मंडळाधिकारी यांच्या अहवालामध्ये व अर्जदार यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांचे नावे कुठेही शेतजमीन नाही असे म्हटले आहे. या दाखल्यामुळे युवकांना रोजगार मिळण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळून घेता येईल.