संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जिल्ह्यात गुन्हेगारांवर वचक बसून, एकंदरीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी माझ्या संकल्पनेतील टुप्लस योजना सर्वच पोलिस ठाण्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाई केलीच, पण त्याच्या गुन्हेगारी हालचालीवर पोलिस प्रशासनाला बारकाईने लक्ष ठेवाता आले आहे, अशी माहिती गुरुवारी (दि.३०) पञकारांशी बोलताना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके, नूतन नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे हे उपस्थित होते.
श्री पाटील पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व संबंधित आरोपीवर प्रभावी प्रतिबंधक कारवाईसाठी अहमदनगर जिल्हयात २०११ पासून टुप्लस योजना कार्यान्वयीत करण्यात आली. योजनेसाठी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच कमी कालावधीत टुप्लस योजनेसाठी लागणारी माहिती तात्काळ उपलब्ध होण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर आणि स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर येथे एक पोलिस अधिकारी व दोन पोलिस अंमलदार यांची टुप्लस पथक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मालाविषक ज्या दोनदोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची सन २०११ पासून माहीती संकलित करण्यात आली. शरीरविषयक ज्या आरोपींवर दोन अथवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपीची सन २०१५ पासून माहीती संकलित करण्यात आली. संकलित केलेली माहीती टु प्लस पथकामार्फत टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आलेली आली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ पासून टुप्लस योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीस ३८४९ (मालाविषयक-१९१४,शरीरविषयक-१९२७) आरोपींचा टुप्लस योजनेमध्ये समावेश करून त्यांची संकलित केलेली माहिती टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आली होती.
जानेवारी २०११ पासून ते आजपावेतो दैनंदिन अटक आरोपीमधून नव्याने १००२ (मालविषयक ४९२, शरीराविषयक १९२७ ) आरोपी टुप्लस योजनेमध्ये समावेश करून त्यांची संकलित केलेली माहिती टुप्लस योजनेच्या वेबसाईटवर भरण्यात आलेली आली आहे.
जानेवारी २०२१ पासून ते आजरोजी पर्यंत दैनंदिन अटक आरोपींमधून नव्याने १००२ (मालविषयक ४९२, शरीराविषयक,५१०) आरोपी निष्पन्न करण्यात करण्यात आले असून आजपोवतो ४८४३ आरोपी वेबसाईटवर माहिती भरण्यात आलेली आली आहे. ४८ ४३ आरोपीमध्ये मालाविरुद्ध एकूण २४०६ गुन्हेगार आहेत. शरराविरुध्द २४३६ गुन्हेगार आहेत. मालाविरूध्द गुन्हे करणारे २४०६ गुन्हेगारांमधून ५७० सराईत , प्रोफेशनल, व्यवसाईक गुन्हेगार निवडून त्यांची माहिती प्रोफेशनल क्रिमिनल वेबसाईटवर भरण्यात आलेली आहे. अशा टुप्लस वेबसाईटवर सामाविष्ठ ४८४३ आरोपींमधून आजपावेतो मालाविषयक २५० व शरीरविषयक १५१ अशा एकूण ४०१ टोळ्या निष्पन्न करण्यात आल्या आहे. ज्या क्रियाशिल टोळया आहेत, अशा टोळयांवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
👉आरोपींचे मेळावे घेतली. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२१ पासून टुप्लस योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर सुरुवातीस ३८४१ आरोपींचा टुप्लस योजनेमध्ये समावेश करण्यात आला. अशा आरोपीचे गुन्हयांसंबंधी मत परिवर्तन करण्यासाठी अहमदनगर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला आरोपीचे मेळावे घेण्यात आले. मार्गदर्शन करण्यासाठी समाज प्रबोधनकार कायदातज्ञ व्यक्ती, न्यायाधिश यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलविण्यात आले होते. काही ठिकाणी स्वतः भेट देवून आरोपींना मार्गदर्शन केले. मेळाव्यात आरोपीचे फोटो, फिंगर प्रिंट तसेच इतर माहीतीचे फॉर्म भरुण घेण्यात आले, असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.