नगर उड्डाणपूल कॉलमवर चित्रातून छ. शिवाजी महाराजांचा जीवनपट साकारणार


👉खा. डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :
नगर शहरात सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे लवकरच हे काम पूर्ण होऊन नगरकरांना दिवाळीच्या दिवशी गोड भेट दिली जाईल नगर शहराच्या सुशोभीकरणात भर पडावी व छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन पट समाज व युवा पिढीसमोर यावा यासाठी मी व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उड्डाणपुलाच्या कोलमवर छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणापासून ते राज्यभिषेक पर्यंतचा जीवन पट चित्राच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे यासाठी आम्ही दोघांनीही एक कोटी रुपयांचा निधी सुपूर्त केला आहे सर्व उड्डाणपूल हा सीसीटीव्ही कॅमेरे च्या नजर काही देत राहणार आहे या उड्डाणपुलाचे काम भारतात जलद गतीने होणारा हा पहिला उड्डाणपूल आहे महाराष्ट्रात पक्षविरहित विकासाचे काम आम्ही दोघे करत असून हे विकासाचे चित्र महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे असे प्रतिपादन खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले
.


आंबेडकर चौक येथे उड्डाणपुलाच्या कॉलमवर छत्रपती शिवाजी महाराजचा जीवनपट चित्राच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या कामाचा शुभारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला समवेत उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक अॅड धनंजय जाधव, निखिल वारे, प्रकाश भागानगरे, महेंद्र भैया गंदे, नगरसेवक रामदास आंधळे, अजय चितळे, दत्ता गाडळकर, मनीष साठे, संजय चोपडा, अविनाश घुले, सतीश शिंदे, संजय ढोणे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की नगर शहर स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे शहर विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पक्षविरहित विकास कामे झाली पाहिजे यासाठी खा.डॉ. सुजय विखे पाटील आम्ही दोघांनी उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून स्टेट बँक चौक व सक्कर चौकामध्ये कामाला गती देण्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे येत्या 13 तारखेपासून 45 दिवस उड्डाणपुलाच्या रस्त्यावरील वाहतूक वळविले जाणार आहे तरीही नगरकरांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
👉नगर जिल्ह्याच्या विभाजनाची गरज नसून नगर जिल्ह्याची ताकद ही एकत्रितपणे असणे गरजेचे आहे. नगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय महत्वाचा नसून जनतेचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. माझा अजिंठा हा विकासाचा आहे, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पा. यांनी मांडले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!