नगरात विनापरवाना बेकायदा लॉटरी सेंटर छाप्यातील आरोपींवर वाढवी कलमान्वेय कारवाई

👉तपासामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा कलम,,( 66 ड )हा समाविष्ट करण्यात आला.
👉विनापरवाना ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार अड्डयावर धडक छापेमारीत १५ जणांवर गुन्हे
होती.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
आठ दिवसांपूर्वी  अहमदनगर शहरांमध्ये सुरु असणा-या  विनापरवाना बेकायदा लॉटरी सेंटरवर आयजी पथकाने छापे टाकण्यात आले होते. यानंतर १५ आरोपींवर गुन्हे ही दाखल करण्यात आले, पण यात पोलिसांनी अधिक तपास करून छाप्यात पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार वाढवी कलम ( 66 ड )हा वाढविण्यात आला आहे. यामुळे विनापरवाना बेकायदा लॉटरी चालकांची चांगलीच दाबे दाणाणले आहे.


नगर जिल्ह्यातील शहरात सुरु असलेल्या विनापरवाना ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगार अड्डयावर आयजीच्या पथकाने दि.४ जुलै ला धडक छापेमारी केली होती. या छाप्यात १५ जणांविरुध्द नगर शहरातील पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ चे कलम ४ व ५ सह लॉटरी (विनियमन) अधिनियम १९९८ चे कलम ७ (३), ९(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आयजी पथकाने एकूण १ लाख ४० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याचा पोलीसांनी अधिक तपास करून  माहिती तंत्रज्ञान कायदा कलम,,( 66 ड )हा वाढीव कलम लावण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी पोनि बापू रोहोम, सपोनि सचिन जाधव व पोह शेख शकील अहमद, पोह सचिन दिलीप धारणकर, पोना कुणाल सुरेश मराठे, पोना प्रमोद मंडलिक आदिंच्या पथकाने ही कारवाई मागील मंगळवारी (दि.४) करण्यात आली होती. परंतु या कारवाईनंतर एक दिवस सर्व अवैध धंद्यांसह जुगार बंद होते. पण असो…

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!