नगरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १३ जनावरांची कोतवाली पोलीसांकडून सुटका

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
शहरातील झेंडीगेट परिसरात कतलीसाठी डांबून ठेवलेल्या १३ गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलीसांकडून सुटका करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पोसई गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे पोना गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना योगेश कवाष्टे, पोना सलीम शेख, पोकॉ दिपक रोहकले, पोकॉ अभय कदम, पोकाँ सुजय हिवाळे, पोकॉ अमोल गाढे, पोकाँ तान्हाजी पवार, पोकाँ सोमनाथ राउत, पोना राजु शेख, पोकॉ अतुल काजळे, मपोना वर्षा पंडीत, मपोकॉ सोनाली खरमाळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, दि ६ जुलै २०२२ रोजी ३.३० वाजण्याच्या सुमारास पोनि श्री शिंदेसर यांना माहिती मिळाली की, अहमदनगर शहरातील आंबेडकर चौक झेंडीगेट कन्हय्या पतंगवालेच्या पाठीमागे माचीगल्ली येथील नसिर बाबु अमीर कुरेशी यांच्या खोलीमध्ये काही गोवंशीय जणावरे कत्तल करण्याकरीता डांबून ठेवण्यात आले आहेत. त्यांची कत्तल केली जात आहे, आता गेल्यास मिळून येईल. या माहितीनुसार त्या ठिकाणी जावून खात्री करून छापा टाका असा तोंडी आदेश दिल्याने पोसई गजेंद्र इंगळे व गुन्हे शोध पथक यांनी लागलीच दोन पंचाना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन माहिती समजावून त्यावरुन छापा टाकला. ठिकाणी थांबलेला इसमांना आम्हा पोलीस व पंचाची चाहुल लागताच ते तेथून पळून जावू लागले. त्यावेळी आम्ही पोलीसांनी त्याचा पाठलाग केला असता, दोन्ही गल्ली-बोळांचा फायदा घेऊन नजरे आड झाले. ठिकाणी डांबून ठेवलेल्या जनावरांची पाहणी केली असता जनावरे ही दोरीने बांधून त्यांना कोठेही चारा, पाण्याची व्यवस्था केलेली दिसून आली नाही. यावरुन जनावरे ही कत्तल करण्याकरीता आणलेली असल्याची खात्री झाली. या ठिकाणावरुन पळून नजरे आड झालेल्यांची परिसरात चौकशी करता त्यांची नावे नसिर बाबु अमिर कुरेशी, मुनाफ कुरेसी दोघे (रा आंबेडकर चौक झेंडीगेट अहमदनगर) अशी असल्याचे समजली. डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरे ही
१ लाख ५२ हजार रुपयांची होती. यात गावरान व जर्सी गाया मिळून आल्याने नसिर बाबु अमिर कुरेशी, मुनाफ कुरेशी (दोघे रा आंबेडकर चौक इंझेंडीगेट अहमदनगर, दोघेही फरार) यांनी गोवंशीय जनावरे ही कोठून तरी खरेदी करुन त्यांची कत्तल करण्याकरीता तसेच त्यांना चारा, पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अश्यारितीने दोरीने दाटीवाटीमध्ये बांधलेल्या स्थितीमध्ये मिळून आले आहे.या पोकाॅ दिपक रोहोकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुध्द महाराष्ट्र
प्राणीरक्षा अधिनियम सन १९९५ चे कलम ५ (ब), ९ सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना रियाज इनामदार हे करित आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!