नगरला दि.१९ जूनपासून पोलीस दलामध्ये शिपाई, बॅण्डस्मन, चालक पदांची पोलीस भरतीस प्रारंभ

नगरला दि.१९ जूनपासून पोलीस दलामध्ये शिपाई, बॅण्डस्मन, चालक पदांची पोलीस भरतीस प्रारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर : जिल्हा पोलीस दलामध्ये शिपाई, बॅण्डस्मन व चालक पदाची पोलीस भरती बुधवारी दि. १९ जून २०२४ रोजी पासून सुरु होत आहे.
पोलीस शिपाई, बॅण्डस्मन या पदा करीता १ हजार ९४७ उमेदवारांनी तर चालक पोलीस शिपाई या पदासाठी ३ हजार ९०९ असे एकूण ५ हजार ८५६ उमेदवारांनी पोलिस प्रशासनाकडे अर्ज केले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी नगर एलसीबी पोनि दिनेश आहेर व नगर पोलिस प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई, बॅण्डस्मन यांची २५ पदे व चालक पोलीस शिपाई यांची ३९ पदांची भरती प्रक्रिया बुधवार दि. १९ जून २०२४ रोजी सकाळी ५ वा. पासून पोलीस मुख्यालय (सर्जेपुरा, अहमदनगर) येथे सुरु होणार आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई/बॅण्डस्मन या पदा करीता १९४७ उमेदवारांनी आवेदन अर्ज व चालक पोलीस शिपाई या पदा करीता ३९०९ असे एकुण ५८५६ उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
भरती प्रक्रिया वेळी सर्वप्रथम उमेदवारांची प्राथमिक कागदपत्र पडताळणी, शारिरीक पात्रता व उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे.
मैदानी चाचणी वेळी पावसामुळे व्यत्यय आल्यास अगर मैदानी चाचणी होऊ न शकल्यास उमेदवारांना पुढील सुयोग्य तारीख देण्यात येणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरीता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करीता हजर राहण्याची सूचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ (चार) दिवसांचे अंतर ठेवून पुढील सुयोग्य तारीख देण्यात येईल. मात्र या करीता उमेदवारांनी पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावा दुस-या मैदानी चाचणीचे वेळी सादर करावे लागतील. असा अर्ज उमेदवार स्वतः हजर राहुन अगर sp.ahmednagar@gmail.com या मेल आयडीवर पाठवु शकतील.
उमेदवारांना इतर काही अडचणी अगर शंका असल्यास उमेदवारांनी नियंत्रण कक्ष अधिकारी, जिल्हा अहमदनगर यांचेशी संपर्क साधून आपली अडचण अगर शंका नोंदविण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिकारी, अहमदनगर यांच्याकडील संपर्क क्रमांक ०२४१ – २४१६ १३२२) व मोबाईल क्रमांक :- ९१५६४३८०८८ या ऩंबर संपर्क साधण्याचे आवाहन एसपी श्री ओला यांनी केले आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!