नगरचे सेवानिवृत्त पोउनि शेख अल्ताफ मोहियोद्दीन यांना राष्ट्रपती पोलीस पदक

नगरचे सेवानिवृत्त पोउनि शेख अल्ताफ मोहियोद्दीन यांना राष्ट्रपती पोलीस पदक
राष्ट्रपती पदक अलंकरण समारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : येथील सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक शेख अल्ताफ मोहियोद्दीन यांना राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून “सराहणीय सेवा मेडल” २६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर झाले होते. राष्ट्रपती पोलीस पदक हे त्यांना दि.६ जून २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे देण्यात आले आहे.


पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) श्रीमती सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
अल्ताफ शेख यांना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केले बद्दल ३६८ बक्षीसे मिळाली आहेत. त्यांनी कोतवाली, तोफखाना, कर्जत पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखा, नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी उत्कृष्ट सेवा केली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!