धार्मिक स्थळांमधून एकतेचा संदेश मिळतो – बाळासाहेब बोराटे

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर –  रामचंद्र खुंट येथील नालसाहब सवारी ट्रस्टला जादा आलेली मनपाची कर आकारणी माफ केल्याचे पत्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी ट्रस्टचे पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, सय्यद अन्वरभाई, अमित मोहिते, गुलाम हुसेन, शफी बागवान, विशाल वालकर, तारिक कुरेशी आदि उपस्थित होते.

    यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, रामचंद्र खुंट येथील नालसाहब सवारी ट्रस्टच्या जागेत फक्त धार्मिक कार्यक्रम होतात. त्यांचा व्यवसायिक वापर नसल्याने मनपाने चुकीच्या पद्धतीने संकलित कर आकारण्यात आला होता. कोणतेही धार्मिक स्थळ असो, तेथून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येत असतो.  वास्तविक पाहता मनपा अधिनियमन 132(1) (ब) प्रमाणे फक्त धार्मिक कार्य होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीने कर आकारणी करता येत नाही. याबाबत आम्ही मनपाकडे कायदेशिररित्या सातत्याने पाठपुरावा करुन चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला कर मागे घेण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे नगरमधील कोणतेही धार्मिकस्थळ जसे मंदिर, मस्ज़िद, गुरुद्वारा, चर्च आदिंचा वापर जर व्यवसायिक होत नसेल तर त्यांचाही  कर कमी करण्यासाठी आमच्याशी किंवा मनपाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी सय्यद अन्वरभाई म्हणाले, शासनाच्या नियमाप्रमाणे धार्मिक स्थळांचा जर वापर व्यवसायिक होत नसेल तर त्यांना त्याप्रमाणे कर आकारले जातात. परंतु या ट्रस्टला व्यावसायिक दराने मनपाने कर व शास्ती आकारली होती. याबाबत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांना याबाबत सांगितले, त्यांनी मनपाकडे पाठपुरावा करुन हा जादा कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यापुढील काळात मस्ज़िद नियमाप्रमाणे नियमित कर भरले, असे सांगून याकामी मदत केल्याबद्दल श्री.बोराटेे यांचे आभार मानले.

    याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले,  शहरातील शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. धार्मिक वास्तूंना कर आकारणी होणे चुकीचे आहे. याबाबत नगरसेवक बाळासाहेब बोराटे व शिवसेनेने पाठ पुरवा करुन याबाबत आवाज उठविला आहे. त्यामुळे ट्रस्टचा कराबाबतचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे. पुढील काळातही अशाच पद्धतीने कार्यरत राहू, असे सांगितले. ट्रस्टच्यावतीने  यांनी नगरसेवक बाळासाहेब बोराटे व दिलीप सातपुते यांचा सत्कार करुन आभार मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!