संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरात येणाऱ्या दौंड महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी फोरव्हिलर रस्त्यातील डिव्हायडरला जोराने धडकली. यानंतर दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन जोराने धडकून ती उडून पडल्याने या झालेल्या अपघातात दोघे मयत झाले. तिघे जखमी झाले आहेत.
अपघातात मयत यांची नावे साहिल सादिक शेख (रा. बुरडगाव रोड नक्षत्र लाॅन, अहमदनगर), संतोष मोरे (रा. चिपाडे मळा, अहमदनगर)
जखमी याप्रमाणे विकी राजू कांबळे (वय २१, रा. रांजनी माकणी ता. नगर), तेजस राजेंद्र ठोंबे ही दोघे खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले. जखमींना नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी तातडीने दखल केले आहे.