दोघांवर ८ गोळ्या झाडून फरार झालेला पोलीस आरोपीस पकडले ; डिवायएसपी मिटकेंच्या टिमची कामगिरी

दोघांवर ८ गोळ्या झाडून फरार झालेला पोलीस आरोपीस पकडले ; डिवायएसपी मिटकेंच्या टिमची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : ठाणे जिल्ह्यात दोघांवर आठ गोळ्या झाडून फरार झालेला पोलीस आरोपीस राहाता तालुक्यातील कोल्हार येथे सिनेस्टाईलने शिर्डी डिवायएसपी संदिप मिटके यांच्या टिमने पकडला.सुरज देवराम ढोकरे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी डिवायएसपी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार लोणी पोलिस ठाण्याचे सपोनि युवराज आठरे, पीएसआय योगेश शिंदे, एएसआय बाबासाहेब लबडे, पोहेकाॅ दिनेश चव्हाण, सुरेश पवार, एकनाथ सांगळे, भाऊसाहेब आव्हाड, पोना रवींद्र मेढे, निलेश धाधवड , अशोक शिंदे, श्याम जाधव, पोकाॅ दिनेश कांबळे, अमोल फटांगरे चालक पोहेकाॅ वर्पे व चापोकाॅ ज्ञानेश्वर गांगुर्डे, होम हारदे, होम अभिजित साळवे, होम विशाल राऊत, होम गणेश साळुंके आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.


याबाबत समजलेली माहिती अशी की, ठाणे ग्रामीण मधील पडघा पोलिस ठाणे हद्दीमध्ये दि.१३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मैदे गावाजवळ (ता.भिवंडी) येथे आरोपी सुरज देवराम ढोकरे याने फिर्यादी अजिम अस्लम सय्यद आणि त्याचा आतेभाऊ फिरोज रफिक शेख यांच्यावर जीवे ठार मारण्याचा उद्देशाने अजिम यांच्यावर ६ आणि फिरोज यांच्यावर २ गोळ्या सरकारी ग्लॉक १९ Made in USA या पिस्तूलातून झाडल्या. त्याबाबत पडघा पोलिस ठाण्यात गुर.नं ५३३/२३ भारतीय दंड संहिता ३०७, भारतीय हत्यार कायदा ३/२५ गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी दि.१५ ऑक्टोबर २०२३ रोजी गुन्ह्यातील आरोपी हा अहमदनगरकडून नाशिकच्या दिशेने जात असल्याबद्दल माहिती शिर्डी डिवायएसपी संदिप मिटके यांना मिळाली. त्यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेज वरून आरोपीला ताब्यात घेण्याकरिता ३ टिम तयार करून कोल्हार येथे नाकाबंदी लावण्यात आली‌. आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या ग्लॉक १८ पिस्तलसह कोल्हार बसस्थानकावरून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले . आरोपी हा मुंबई पोलीस दलात नायगाव पोलीस मुख्यालय क्युआरटी मध्ये आर्मरर या पदावर कार्यरत आहे. आरोपीस पुढील तपास कामी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!