दुधोडी शेतक-यांना डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-:
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुधोडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थी श्रेयस ओझा, आदित्य पाटील, प्रथम लोंढे, ओंकार जाधव, सौरभ नरुटे, विवेक मस्के,पार्थ जाधव यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले.


यावेळी श्रेयस ओझा या विद्यार्थ्यांने; शेतकऱ्यांनी माती परीक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले, आपल्याला जमिनीची सुपीकता कायम ठेवायची असेल तर माती परीक्षण करणे गरजेचे आहे असे आवाहन सर्व विद्यार्थ्यांनी केले. माती परीक्षणातून आपल्याला उपलब्ध नत्र, स्फुरद ,सूक्ष्म अन्नद्रव्य ,विद्राव्य क्षार, जमिनीचा सामू आदिंची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली, माती परीक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले.
माती परीक्षण प्रयोगशाळा सावेडी तालुका बीजगुणन प्रक्षेत्र, अहमदनगर येथे जाऊन माती परीक्षण करावे याचे आवाहन केले यावेळी काही मार्गदर्शन केले जसे की मातीचा नमुना साधारणपणे पिकांची काढणी झाल्यावर परंतु नांगरनीपूर्वी घ्यावा,शेतात जनावरे बसण्याच्या जागा, खत व कचरा टाकण्याच्या जागा, झाडाखालची जागा येथील घेऊ नये याविषयी मार्गदर्शन केले.
सरपंच साहेब रमेश जांभळे, कृषिसेवक भोईटे, ग्रामसेवक पवार मॅडम, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जांभळे आदिं ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!