दुचाकी चोरणारे दोघे चोरटे पकडले, २ लाखांचा मुद्देमाल जप्त ; नगर एलसीबीची कारवाई

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
अहमदनगर-:
नगर तालुक्यातील निंबळक येथून बुलेट मोटारसायकल व दोन मोबाईल फोनची चोरी करणारे दोन आरोपीसह २ लाख २० हजार रु. किंमतीचे मुद्देमालासह पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
समीर बालम शेख (वय २७, नशेमन कॉलनी, मुकुंदनगर, अहमदनगर), प्रशांत पोपट सातपुते (वय २६, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा ) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल व नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना लक्ष्मण खोकले, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, पोकाॅ मेघराज कोल्हे, योगेश सातपुते व चापोहेकॉ उमाकांत गावडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. १४ जुलै २०२२ रोजी त्रास होऊ लागल्याने निंबळक-नागापूर रोडलगत असलेल्या हॉटेल सावली समोरील शेड येथे त्यांची बुलेट मोटारसायकल लावून थांबलेले असतांना अज्ञातांनी त्यांची मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा ६० हजार र. किंचा मुद्देमाल चोरी करुन नेला होता. या प्रशांत घनश्याम म्हस्के (रा. निंबळक, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५२९/२०२२ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने एलसीबी पोनि अनिल कटके यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून तपासबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीतांची माहिती घेऊन शोध घेत असतांना पोनि श्री कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, गुन्हा हा समीर शेख याने केला आहे. तो आता मुकुंदनगर येथे त्याचे राहते घरी आलेला आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकाने मुकुंदनगर, अहमदनगर येथे जाऊन मिळालेल्या माहितीवरुन आरोपीचे घराजवळ जाऊन सापळा लावून थांबलेले असतांना एक संशयीत येतांना दिसला. त्यास शिताफीने ताब्यात घेऊन नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव समीर बालम शेख, ( नशेमन कॉलनी, मुकुंदनगर, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, त्यास अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली, असता त्याने गुन्हा हा त्याचा साथीदार प्रशांत सातपुते सोबत मिळून केल्याची कबुली दिली. पथक मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत पोपट सातपुते (वय २६, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा) असे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरलेला बुलेट मोटारसायकल व दोन मोबाईल फोन असा एकूण २ लाख २० हजार रु. किं. चा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करुन आरोपीना मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!