संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार असणा-या आरोपीसह वांबोरी घाटात वाहन चालकांना अडवून लुटमार करणारे आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगितले जात आहे . सुरेश रणजित निकम, सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव या तिघांना पकडण्यात आले आहे.
यापूर्वीच विकास बाळू हनवत, करण नवनाथ शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २३ एप्रिल रोजी मित्रासह गोरक्षानाथ गड, मांजरसुंबा येथे त्यांची ( एमएच१६ सीबी ३३२८) या दुचाकीवरुन वांबोरीफाटा मार्गे जात असतांना गोरक्षनाथ गडाच्या चढावर दुचाकीचा वेग कमी झाला. त्यावेळी घजालानी यांच्या समोरुन दोन व पाठीमागुन दोन असे एकूण ४ अज्ञात इसम दोन दुचाकीवरुन त्यांच्याजवळ येऊन त्याच्या मित्रास मारहाण करुन घजालानी व त्याचा मित्राजवळील ३ मोबाईल व सोने चांदीचे दागिणे असा एकूण १ कोटी १६ लाख ५ हजार रु. किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितीक प्रेमचंद छजलानी (वय २० वर्ष रा. पंचशीलनगर, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. २५४/२०२१ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापूर्वी आरोपी विकास हनवत, करण शेलार व एक अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पो.स्टे. ला हजर केलेले आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुरेश निकम हा फरार झालेला होता. या फरार आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या पथकाच्या मदतीने शोध घेत असताना श्री कटके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली, आरोपी सुरेश निकम हा कात्रड येथे त्याचे घरी आला आहे. त्यानुसार श्री कटके यांनी त्यांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने आरोपी रहात असलेल्या परिसरात सापळा लावला असता सदर आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागल्याने तो पळून जावू लागला. त्यावेळी पथकातील पोलीसानी आरोपीचा पाठलाग करुन आरोपी सुरेश रणजित निकम यास ताब्यात घेतले.
त्यास विश्वासात घेऊन सदरच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास अधिक विश्वसात घेऊन कसून व सखोल चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा यापूर्वी अटक करण्यात आलेले साथीदार तसेच सतिष बर्डे व सागर जाधव अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यावरुन पथकाने आरोपींचा शोध घेऊन आरोपी सतिष अरुण बर्डे, सागर शिवाजी जाधव यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, संदीप पवार, दिनेश मोरे, दिपक शिंदे, पोकॉ मच्छिन्द्र बर्डे, रविन्द्र घुंगासे, संदीप दरंदले, योगेश सातपूते, जालिंदर माने आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापुर्वी दरोडा, जबरी चोरी या सारखे खालील प्रमाणे गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात अद्याप पावेतो फरार आहे.
आरोपी सुरेश रणजित निकम याचे विरुध्द गुन्हे दाखल असून एमआयडीसी पो.स्टे. गुरनं. २१०/२०१५ भादवि कलम ३४१, ३९४, ३९५, ३९७ (फरार) २१५/२०१५ भादवि कलम ३९४, ३९५, ३९७ (फरार),एमआयडीसी पो.स्टे. एमआयडीसी पो.स्टे. सोनई पो.स्टे. गुरनं. येथे दाखल आहे.
आरोपी सतिष अरुण बर्डे याचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे..,राहूरी पो.स्टे. येथे विविध प्रकारचे गुन्हा दखल आहे.
आरोपी सागर शिवाजी जाधव याचे विरुध्द दाखल गुन्हे एमआयडीसी पो.स्टे. ,एमआयडीसी पो.स्टे. गुरनं.,पारनेर पो.स्टे. गुरनं. राहूरी पो.स्टे. गुन्हा दाखल केले आहे.