समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न -प्रसाद शिंदे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- तिळवण तेली समाज ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ट्रस्टच्या माध्यमातून महिलांसाठी बचत गट, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी समाज बांधवांचे मोठे सहकार्य मिळत असल्याने आम्हासही काम करण्याचा प्रोत्साहन मिळत आहे. समाजोन्नत्तीच्या कार्यास ट्रस्ट कायम प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे सचिव प्रसाद शिंदे यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने समाजातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव प्रसाद शिंदे, योगेश भागवत, शुभम भोत आदि उपस्थित होते.
याप्रसंगी उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर म्हणाले, विद्यार्थ्यांनीही चांगला अभ्यास करुन नाव कमवावे, असे सांगून ट्रस्टच्यावतीने राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली.यावेळी अध्यक्ष सागर काळे, खजिनदार प्रकाश सैंदर, विश्वस्त गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, निता लोखंडे, शोभना धारक आदि उपस्थित होते.