चोरीच्या १३ लाखांच्या दुचाकी हस्तगत, टोळी जेरबंद ; ‘नगर एलसीबी’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : तब्बल १३ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या ५ बुलेट्सह १० दुचाकी चोरणारी टोळीस पकडण्यात ‘नगर एलसीबी’ला यश आले आहे. अनिल मोतीराम आल्हाट (वय २३, रा. श्रीगोंदा), हर्षद किरण ताम्हाणे (वय १८, रा. श्रीगोंदा, निखील उद्धव घोडके (वय १८, रा. श्रीगोंदा जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
ताब्यातील आरोपींकडून अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, विशाल तनपुरे, अमोल कोतकर, संतोष खैरे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.