डॉ.सुजय विखे पा., यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच भिंगारात आतिषबाजी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : अ.नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीची डॉ. सुजय विखे पा. यांची उमेदवारी जाहीर होताच, भिंगार येथे भाजपा युवा मोर्चाचे मा. भिंगार मंडल अध्यक्ष किशोर कटोरे व कॅन्टोन्मेंट व्हॉइस प्रेसिडेंट वसंत राठोड यांच्या वतीने जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
अहिल्यानगर शहराचे खासदार डॉ. सुजय विखे पा. यांना दुसऱ्यांदा अहिल्यानगर दक्षिण मतदार संघातून पुन्हा उमेदवारी मिळाल्याबद्दल भिंगार शहरात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. खा. सुजय विखे पा. यांनी भिंगार शहराच्या विकासासाठी २ कोटी रुपये मंजूर करून लवकरात त्या सर्व कामांचे लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे, असे भाजपा युवा मोर्चाचे मा.भिंगार मंडल अध्यक्ष श्री किशोर कटोरे म्हणाले तसेच वसंत राठोड यांनी सर्व शक्ती केंद्रप्रमुख तसेच बूथ प्रमुखांना आपकी बार 400 पार करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किशोर कटोरे, कॅन्टोन्मेंट बोर्ड व्हाईस प्रेसिडेंट वसंत राठोड, अनंत रासने, राकेश भाकरे ,आनंद बोथरा, शुभम खराडे, संतोष हजारे, योगेश रासकर, अक्षय मिटकर ,सुरेश तनपुरे, अजय देवकुळे, सौरभ रासने, शशिकांत गोरसे ,योगेश चेमटे, पंकज कटोरे, वैभव कटोरे आदी उपस्थित होते.