संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
pune पुणे : राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा(टीईटी) अाणि अाराेग्य विभाग गट ‘क’च्या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील तपासात अमरावती येथील निशीद गायकवाड (४३) यास दिल्ली येथील एजंट अाशुताेष शर्मा व इतरांनी पेपर पुरवल्याची माहिती तपासात सुमोर आली आहे. त्यानुसार, पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून अाशुताेष श्रीवेदप्रिय शर्मा (३८) यास अटक केली.
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० परीक्षेत व निकालात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सायबर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. त्यानुसार परीक्षा परिषदेचे अायुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक करण्यात अाली. चाैकशीदरम्यान सुपे याचा चालक सुनील घाेलप याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यासही अटक करण्यात अाली. एजंट मनाेज डाेंगरे, अमरावती येथून निशीद गायकवाड व राहुल लिंघाेट यांनाही अटक झाली आहे. यांना दिल्लीतील एजंट अाशुताेष शर्मा याने पेपर पुरवल्याचे स्पष्ट झाले होते.