जोरदार पावसामुळं शेवगाव गेवराई राज्य मार्ग पाण्याखाली वाहतूक ठप्प प्रवाशी अडकले बोधेगाव, ठाकूर पिंपळगाव येथे पुलावरून जोरदार पाणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्कम

शेवगाव –  पाथर्डी व शेवगाव या दोन तालुक्यांच्या भागात जोरदारपणे पावसाने हजेरी लावल्याने नांदणी नदीला पूर आल्याने पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, औरंगपूर व पागोरी पिंपळगाव तसेच शेवगाव तालुक्यातील आखेगाव,वरुर ,ठाकुर पिंपळगाव या नदीकाठावरील गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक घरे पाण्यात गेली आहेत,बचाव पथके नसल्याने अडचण होत आहे पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत परंतु प्रभावी सुविधा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. बचावकार्यासाठी नेवासा पैठण येथून बोट मागविण्यात आली असल्याचे प्रशासन कडून सांगितले जात आहे तर आखेगाव येथे नदीला पाणी आल्याने शेकडो घरात पाणी शिरल्याने  पाण्यात आहेत वस्तीवर राहणाऱ्या बाबासाहेब पालवे यांची वस्ती पूर्ण पाण्यात गेल्याने असंख्य कुटुंब अडकले आहेत रात्रभर घराच्या गच्चीवर भर पावसात थांबले आहेत.
ठाकुर पिंपळगाव येथे ट्रक वर अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले आहे. अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या तक्रारी आहेत, वीज पुरवठा खंडित झाल्याने नेटवर्क व संपर्क करणे अडचणीचे ठरत आहे रात्री १० वाजले पासून पावसाने सुरवात केली सकाळपर्यंत कमी अधिक पाऊस सुरू आहे
सर्वत्र पाणी पाणी झाल्याने नद्या नाले दुथडी वाहू लागले आहेत.
👉नुकसानीचे पडताळणी करून अहवाल सादर करत आहोत. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. अर्चना पागिरे (तहसीलदार शेवगाव )


👉आखेगाव येथे अनेक घरे पाण्यात गेली आहेत तर गणेश दिलीप काटे यांचे चापडगाव येथे आज लग्न आहे पण नवरदेव पाण्यात अडकला आहे जोरदारपणे अतिवृष्टीमुळे शेवगाव तालुक्यातील नदी काठच्या  वरूर, भगूर,  आखेगाव,अंतरवाली खुर्द, बोधेगाव, हातगावं, ठाकूर पिंपळगाव, चापडगाव, लखामपुरी, आदी गावात नदीच्या  पुराचे पाणी शेतात घुसल्याने खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तूर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
👉शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर   बोधेगाव येथे पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली असल्याने मराठवाड्याचा संपर्क तुटला गेला आहे मुंबई, पुणे, हिंगोली, नांदेड, आदी जाणाऱ्या महामंडळाच्या एसटी बस पाहाटे पासून दुपारी एक  वाजेपर्यंत अडकून पडल्या आहेत प्रवाश्यांचे मोठे हाल झाले तर एक गर्भवती महिला डिलिव्हरी साठी शेवगाव ला हॉस्पिटलमध्ये चालली होती परंतु पुरामुळे अडकली होती मात्र ग्रामस्थांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.

संकलन  : बाळासाहेब खेडकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!