संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जैन धर्मियात१४.९ टक्के पुरुष व ४.३ टक्के महिला म्हणजे जवळपास २० टक्के समाज हा मांसाहारी असल्याचा अहवाल राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ च्या अहवालात दिला आहे. अहवाल हा अत्यंत खोटा आणि चुकीचा असल्याचे सांगत ऑल इंडिया जैन सोशल फोरम या राष्ट्रव्यापी संघटनेने या अहवालाचा जाहीर निषेध केला आहे.
जैन समाज हा अहिंसेचा पाईक असून अहिंसा ही भगवान महाविरांची शिकवण असून शाकाहार उत्तम आहार हे जैनांचे ब्रिदवाक्य आहे असे असतांनाही चुकीचा आणि खोटा अहवाल समाज माध्यमातून जनतेसमोर आणून जैन समाजाला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र सुरू असल्याचे ऑल इंडिया जैन सोशल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी म्हटले आहे.
ऑल इंडिया जय सोशल फोरमच्या वतीने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयात पाठवलेल्या निषेध निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की देशभरातील जैन समाज अल्पसंख्यांक असला तरी संपूर्ण देशात व विदेशात असलेल्या बांधवांची संख्या लाखोंच्या घरात आहे असे असताना १६३२ महिला व २८० पुरुष यांना भेटून हा अहवाल तयार करण्यात आला आहे या महिला व पुरुषांना अहवालातील कोण व कधी भेटले व यातील किमान शंभर लोकांची नावे तरी अहवाल बनवणार-यांनी जाहीर करण्याचे आवाहन देखील अभिजीत लुणिया यांनी केली आहे . चार भिंतीच्या आत एअर कंडिशन मध्ये बसून कोणाच्या तरी दबावाखाली बनवलेला हा खोटा अहवाल जैन समाजाला बदनाम करण्यासाठीच बनवला आहे, त्याचे जाहीर प्रकटीकरण केल्याचेही निवेदनात म्हटले आहे . केंद्रातील आरोग्य विभागाने अशाप्रकारचा खोटा अहवाल बनवणे व केंद्रीय मंत्रालयाने तो सार्वजनिक रित्या जाहीर करणे हे अत्यंत खेदजनक असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. या अहवालामुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१४ साली जैन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा दिला त्यावेळी ऑल इंडिया जैन सोशल फोरमने प्रमुख भूमिका घेतली होती आजदेखील जैन सोशल फोरमने सर्वप्रथम या अहवालाचा जाहीर निषेध केला आहे.
या निषेध निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे , महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह देशातील सर्व पक्षाच्या प्रमुख यांना पाठविले असून केंद्रीय आरोग्य मंत्री तसेच काँग्रेसचे नेते आदरणीय सोनिया गांधी व राहुल गांधी यांना भेटून सविस्तर निवेदन करणार असल्याची माहिती देखील राष्ट्रीय अध्यक्ष अभिजीत लुणिया व राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड प्रितम कोठाडिया नवी दिल्ली यांनी दिली.