जिल्हा पोलिस प्रशासनाकडून २८ वर्षाचा प्रलंबित ७९८ किलो अंमली पदार्थ नष्ट

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर -:
जिल्ह्यातील विविध गुन्ह्यामध्ये सापडलेल्या अंमली पदार्थ नष्ट करण्याची २८ वर्षापासून प्रशासकीय कार्यवाही प्रलंबित होती. ही नष्ट करण्याची कार्यवाही न्यायालयाच्या आदेशाने अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासनाने सोमवारी (दि.२७) वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. या कार्यवाहीत एकूण ७९८ किलो १०८ ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा/भांग, गर्द) नष्ट करण्यात आला आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, अंमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सन १९९४ ते २०१६ पर्यंत ३२ गुन्ह्यात एकूण ७९८ किलो १०८ ग्रॅम गांजा/भांग, गर्द जप्त करण्यात आला होता. गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात नियमित सुनावणी होऊन न्यायालयीन
प्रक्रियापूर्ण करून न्यायालयाने मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिले होते. राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडील आदेशान्वये जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधिक्षक (गृह) अहमदनगरचे संजय नाईकवाडी पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ विष्णु घोडेचोर, पोहकाॅ भाऊसाहेब कुरुंद, पोहेकाॅ सखाराम मोटे, पोहेकाॅ देवेंद्र शेलार, पोना शंकर चौधरी, पोकाॅ जयराम जंगले, चापोहेकॉ भरत बुधवंत, चापोहेकाॅ बबन बेरड अशांनी अहमदनगर जिल्हयातील सन १९९४-२०१६ या दरम्यान ३२ गुन्ह्यात एकूण व ७९८ किलो १०८ ग्रॅम असा प्रदिर्घ काळापासून नष्ट करण्यासाठी प्रलंबित असलेला अंमली पदार्थ नष्ट करण्याची योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनसोमवार (दि २७) राजणगांव एमआयडीसी (जि. पुणे) येथील कंपनीत नष्ट केला. दि.२ जानेवारी २०२२ पासून ते दि २६ फेब्रुवारी २०२२ रोजी ३२ गुन्ह्याचा ९९७ किलो २७४ ग्रॅम, दि. २७ मे २०२२ रोजी २६ गुन्ह्याचा ६०५ किलो ७५२ ग्रॅम ५८० मिली ग्रॅम व सोमवारी दि.२७ जून २०२२ रोजी ३२ गुन्ह्याचा ६३९ किलो ९१३ ग्रॅम असा ९० गुन्ह्याचा एकूण २ हजार २४२ किलो ९३९ ग्रॅम ५८० मिली ग्रॅम अंमली पदार्थ मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अहमदनगर पोलीस उप अधिक्षक (गृह) चे पोनि मेघश्याम डांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्यासह स्थानिक
गुन्हे शाखेतील अंमलदार यांनी पूर्ण केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!