जिल्हाभरामधील शाळांमध्ये साजरा होणार विश्वविक्रमी “जागर लोकशाहीचा” उपक्रम

जिल्हाभरामधील शाळांमध्ये साजरा होणार विश्वविक्रमी “जागर लोकशाहीचा” उपक्रम
लोकसभा निवडणूक- स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची संकल्पना
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,अहमदनगर यांच्या निर्देशानुसार अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 मध्ये मतदार जनजागृतीसाठी अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी-माध्य.जि.प.अहमदनगर)यांच्या संकल्पनेतून तसेच भास्कर पाटील(शिक्षणाधिकारी प्राथ.जि.प.अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनातून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील समस्त शाळांमध्ये मतदार जनजागृतीच्या विविध उपक्रमांचा “जागर लोकशाहीचा”हा महोत्सव 20 ते 27 मार्च 2024 या कालावधीमध्ये साजरा होणार असून लाखोंच्या संख्येने मतदार जनजागृतीविषयक फोटो/व्हिडिओ/वृत्तपत्रे कात्रणे /पोस्टर/बॅनर /लिंक्स आदी साहित्याच्या जगातील सर्वाधिक संकलनाचा अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा मानस आहे.याकरिता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह अन्य जागतिक विश्वविक्रमांसाठी आपण नामांकन देखील दाखल केले आहे.
महोत्सवाचे नियोजन पुढीलप्रमाणे-20 मार्च- मतदार जनजागृती शपथ घेणे व रांगोळी स्पर्धा ,21 मार्च – चित्रकला स्पर्धा ,22 मार्च -घोषवाक्य स्पर्धा आणि मतदार जनजागृतीपर गीत सादरीकरण ,23 मार्च – रॅली / शोभायात्रा ,26 मार्च – नाटिका सादरीकरण ,27 मार्च -भाषण स्पर्धा ,
वरील सर्व उपक्रमांसाठी पुढील पाच विषय आहेत.1) मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य 2) लोकशाही आणि मतदानाचा हक्क 3) चला मतदानाला 4) मतदार राजा जागा हो 5) .माझे आई-वडील मतदानाला जाणारच.
तसेच 1) वरील कालावधीत सर्व उपक्रम-स्पर्धा शाळेमध्ये आयोजित करावयाच्या असून सर्व स्पर्धांचे सर्व फोटो -व्हिडिओ/,विविध लिंक्स,वृत्तपत्रांची कात्रणे यांचा अहवाल 1 एप्रिल 2024 पर्यंत मोबा -9002 10 9003 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावा. 2)शाळेचे/ शिक्षकांचे यूट्यूब चॅनेल अथवा सोशल मीडिया अकाउंट असल्यास त्यावर आपले वरील विविध उपक्रम पोस्ट करताना #sveepahmednagar हा हॅशटॅग वापरावा.शक्य झाल्यास विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले उपक्रम लाईव्ह करून व्यवस्थित माहिती देखील द्यावी. 3)प्रत्येक कलाकृतीवर स्पर्धकाचे स्वतःचे नाव,शाळेचे नाव,गाव-तालुका ई. तपशील असणे बंधनकारक आहे. 4)उपक्रमातील चित्र ,मतदार जनजागृती शपथ,घोषवाक्य व मतदार जनजागृतीपर गीत तसेच हँडमेड सेल्फी पॉईंट या सर्व साहित्याचा वापर रॅली व शोभायात्रेसाठी करता येईल. 5)विद्यार्थ्यांसाठी मतदार जनजागृती शपथ-“मी माझ्या भारताच्या लोकशाहीला वंदन करून अशी प्रतिज्ञा करतो / करते की येत्या एप्रिल/ मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूक-2024 मध्ये मी माझे आई-वडील तसेच मतदानास पात्र असणारे नातेवाईक-शेजारी यांनी शंभर टक्के मतदान करावे असे मनापासून सांगणार आहे कारण त्यांच्या मतदानात माझ्या भविष्याचे हित दडलेले असून अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदार जनजागृती उपक्रमात सहभागी होऊन मी ही प्रतिज्ञा करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!