जिल्ह्यातील भाजपाच्या या नेत्याला मिळाली जीवे मारण्याची धमकी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस अदिनाथ धायतडक यांना व्हाट्स अ‍ॅप वरुन जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. याबाबत पाथर्डी पोलिसाकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसाकडे दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी रात्री माझ्या वैयक्ती मोबाईल क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने अनोळखी  मोबाईल नंबरवरुन चँटींग करायला सुरुवात केली. त्यावेळी धायतडक यांनी माझा वाढदिवस नसतांना तु का पोष्ट टाकून मला भावी पंचायत समितीचा सदस्य म्हणून शुभेच्छा  दिल्या असे विचारले. त्यावर त्याने व्हाट्स अ‍ॅप संदेशावर तुम्ही माझ्या नंबरचा शोध घेवू नका, माझ्या नंबरची चौकशी करु  नका अन्यथा मी आत्महत्या करील किंवा तुम्हाला जिवे मारीन अशी धमकी दिली.
या बाबत भाजपाचे तालुका सरचिटणीस अदिनाथ धायतडक यांनी पाथर्डी पोलीसाकडे जावून रितसर फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पो.हे. कॉ कृष्णा बडे करीत आहेत.
या बाबत धायतडक पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी राजकीय व्यक्ती व पक्षातंर्गत महत्वाचा पदाधिकारी आहे. माझा वाढदिवस नसतांना वाढदिवस असल्याची पोेष्ट टाकून माझी टिंगल केली. याची विचारणा केल्यावर कोणतेही कारण नसतांना जिवे मारण्याची धमकी देणे हे गंभीर आहे. अनेकाकडून अशा प्रकारचा सोषल मिडीयाचा चुकीच्या पध्दतीने वापर होतो. सोषल मिडीयाच्या जबाबदारीने सर्वांनी वापर करण्याचे आवाहन सरचिटणीस धायतडक यांनी केले आहे. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!