संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोपरगाव : एस व्ही कृषी नेचर कंपनीच्या वतीने नुकताच नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात कोपरगाव येथील गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे यांना जलभूमी सन्मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
आदिनाथ ढाकणे यांनी अल्पावधीतच आपल्या सामाजिक कार्यातून एक वेगळा ठसा उमटवला असून ते शैक्षणिक, सामाजिक, स्वच्छ भारत अभियान, शहर स्वच्छता अभियान, जलशक्ती अभियान, वृक्षारोपण अभियान, पशुपक्षी पर्यावरण संवर्धन अभियान, कोविड १९ चा काळात वाढता विषाणू चा प्रादुर्भाव कमी करणे कामी जनजागृती करण्यासोबतच भारताचे जल पुरुष डॉक्टर राजेंद्रसिंग व प्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जलदिंडी कार्यक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम तसेच गोदावरी नदी अविरत निर्मल ठेवण्यासाठी गेली २३० आठवड्यापासून करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेत कोपरगावचे गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे यांना लोकमत व एस व्ही कृषी नेच यांच्या वतीने जलभूमी सन्मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेते निर्माते चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री संजीवनी कोंडे, निफाडचे पोलीस उपाधीक्षक निलेश पालवे, नगराध्यक्ष शारदा कापसे, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, लोकमतचे उपाध्यक्ष बी.बी चांडक, टॅप लाईटचे महाराष्ट्र हेड संदीप विष्णोइ, कृषी नेचर चे संचालक विलास बगाटे निता बगाटे आदीं मान्यवर उपस्थित होते.