संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : सामाजिक उपक्रमातून तसेच झालेल्या जनजागृतीचा प्रत्यय दिसून आला. तो असा जिल्ह्यातील सुपा या ठिकाणी हिंदू -मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले. बकरी ईदनिमित्त मस्जिदतून नमाज पठण केले, यानंतर थेट मुस्लिम बांधवांनी बसस्थानक चौकात जाऊन तेथे आलेल्या दिंडीतील विठ्ठल रूख्मिणी वेशभूषेतील बाल वारकऱ्यांचे स्वागत करीत सर्व हिंदू बांधवांची भेट घेतली. या दरम्यान आषाढी एकादशी व ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले, सुपा पोलिस ठाण्याच्या पोनि ज्योती गडकरी यांच्यासह सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
सुपा येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सामाजिक सलोखा पाहण्यास मिळला, या अनोख्या उपक्रमामुळे अनेकांनी धन्यता मांडली. तत्पूर्वी आषाढी एकादशी व बकरी ईद ही दोन्ही सण एकत्र आल्याने मुस्लिम बांधवांनी गुरुवारी कुर्बानीचा कार्यक्रम न घेता तो शुक्रवारी घेण्याचा हा निर्णय घेण्यात आला, या निर्णयामुळे एक प्रकारे सामाजिक सलोखा पाहण्यास मिळला. याच पद्धतीने हिंदू -मुस्लिम ऐक्य सर्वत्र नांदो, अशीही प्रार्थना यावेळी दोन्ही समाजांच्या नागरिकांनी व्यक्त केली.
मुस्लिम बांधवांचे नमाज पठण सुरू होते. यावेळीच गुरूदेव इंग्लिश मिडियम स्कुल शाळेच्या बालगोपाळ वारकऱ्यांची दिंडी सुपा गावामध्ये ग्रामप्रदक्षिणेसाठी आली होती. परंतु नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी थेट बसस्थानक परिसरात जाऊन दिंडीतील विठ्ठल रूख्मिणीची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांची भेट घेत, त्या दिंडीतील बालगोपाळ वारकऱ्यांना, दिंडीतील हिंदू बांधवांनाही मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्याने एक सामाजिक ऐक्याचे हिंदू-मुस्लिम बंधूभावाचे अनोखे दर्शन घडले.
आषाढी एकादशी व बकरी ईद ही दोन्ही सण एकत्र आले. यामुळे दोन्ही समाजांच्या सुज्ञ नागरिकांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गुरुवारी आषाढी एकादशी असल्याने कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला. तर शुक्रवारी कुर्बानीचा कार्यक्रम घेतला. यापूर्वी सुपा गावच्या सरपंच मनिषा रोकडे यांनीही मुस्लिम बांधवांना आवाहन केले होते. या आवाहनास मुस्लिम बांधवांनी प्रतिसाद देत गुरूवारीच्या कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत तो कार्यक्रम शुक्रवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरम्यान सामाजिक सलोखा राखून, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुपा पोलीस ठाण्याच्या पोनि ज्योती गडकरी यांनी आपल्या पोलिस कर्मचारी सहका-यांसह चोख बंदोबस्त ठेवला आहे.