संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः दुचाकी चोरी करणारी सराईत गुन्हेगारास पकडून त्या चोरट्याकडून 7 दुचाकी हस्तगत करण्याची कामगिरी तोफखाना पोलीसांनी केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्य मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलिस ठाण्याचे पोनि मधुकर साळवे यांच्या सूचनेनुसार सपोनी नितीन रणदिवे, पोसई सचिन रणशेवरे, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ संतोष गर्जे, पोना भानुदास खेडकर, पोकॉ सुमित गवळी, पोना चांगदेव आंधळे, पोना भास्कर गायकवाड, पोकॉ राहुल म्हस्के, पोकॉ नितीन शिंदे यांच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारच्या सुमारास तोफखाना पोलीस सावेडी भागात पेट्रोलींग करत असताना एक संशयीत दुचाकीस्वार वसंत विजय शिंदे (वय 20, रा. दहेगाव पालखेड ता. वैजापुर जि. संभाजीनगर )हा त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची डिलक्स (एम.एच.16 बी.क्यु.7708) या दुचाकीवर संशीयतरित्या फिरताना मिळून आला. त्याच्याकडे ताब्यात असलेल्या दुचाकी कागदपत्राबाबतच्या विचारणा केली असता त्याने उडावाउडवीचे उत्तरे दिल्याने त्यास चौकशीकामी तोफखाना पोलीस ठाण्यात आणले. तेथे अधिक चौकशी केली असता त्याने दुचाकी ही त्याचे साथीदार विनोद कडुबाळ सरकाळे (वय28, रा.बंधनलॉन मागे. सावेडी अ.नगर) व सागर लक्ष्मण कु-हाडे (वय 25, रा.ढवणवस्ती तपोवन रोड,अहमदनगर) यांच्या मदतीने एमआयडीसी परसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे साहय्याने त्याचे साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास करता त्यांनी अहमदनगर शहरातून विविध ठिकाणावरुन 7 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्या दुचाकी त्याने काढून दिल्याने त्याचा पंचनामा करून जप्त करुन त्या चोरट्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ चेमटे हे करीत आहेत.