संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांच्या वतीने लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाराष्ट्राचे माजी उपमख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री कै मुंडे साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (दि.3) सकाळी रामगड संस्थान येथे कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नेते पोपट दशरथ बडे यांच्या हस्ते पुस्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी चिंचपूर पांगुळ सेवा सोसायटीचे सचिव दगडू बडे, तुकाराम बडे पा., डॉ बांगर, शहादेव बडे,दादा सांगळे,चंद्रकांत बडे, दशरथ बडे, वामन हरी, प्रभाकर बडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
@संकलन- पत्रकार सोमराज बडे मोबा-9372295757