संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व एकलव्य शिक्षण संंस्थेचे सचिव ॲड.प्रतापकाका ढाकणे यांचा वाढदिवस सोमवारी (दि.१८) उत्साहात पार पडला. दरम्यान विविध आयोजित उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.पाथर्डी तालुक्यातील श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपूर पांगुळ येथील कार्यक्रमांना ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रुबा माधव बडे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यभान बडेसर हे होते. प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने सोमवारी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शाळेत हस्ताक्षर, चित्रकला, रांगोळी, भाषण कौशल्य, विविध खेळ तसेच संस्कृतिक कार्यक्रमाची विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
विद्यालयातील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे तसेच गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
त्यानंतर मान्यवर ग्रामस्थ,तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास नरोडे,तसेच इतर शिक्षक यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर आलेल्या नागरीक तसेच विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून प्रतापकाका ढाकणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपसरपंच माउली मेरड, अशोक बडे ग्रा.पं सदस्य विष्णू खाडे, डॉ राजेंद्र खेडकर, डॉ.अशोक बडे, जगन्नाथ बडे, नामदेव बडे,रघुनाथ बडे, वासुदेव बडे, पोपट द.बडे, माचिंद्र खंडागळे, विठ्ठल बडे, विष्णू ढाकणे, राजू बडे , म्हातारदेव ढाकणे, विष्णू सकुंडे, गोविंद बडे, पोपट बडे, केशव आव्हाड, विशाल वनवे, भास्कर अंबिलढगे, विक्रम बडे, नितीन बारगजे, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित उपस्तीत होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र खेडकर मित्रमंडळ व एकलव्य परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची प्रस्तावना बाळासाहेब घुलेसर तर सूत्रसंचालन दहिफळे सर यांनी केले. आभार कैलास नरोडे सर यांनी व्यक्त केले.
संकलन-सोमराज बडे
९३७२२९५७५७