संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथील श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपुर पांगुळ येथे अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पाथर्डी तालुका क्रीडा समितीच्या वतीने १४, १७,१९ वयोगटातील मुले- मुलींच्या तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. यावेळी स्पर्धेत मुलांचे ७० तर मुलींचे २९ शालीय संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीत झालेल्या सामन्यांमध्ये मुलांच्या १४ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक- श्री वामनभाऊ विद्यालय चिंचपुर पांगुळ, द्वितीय क्रमांक- एम,एम,निऱ्हाळी माध्यमिक विद्यालय पाथर्डी, तृतीय-क्रमांक रेणुका माता विद्यालय मोहटे यांनी पटकावला.
१७ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक वृद्धेश्वर हायस्कुल तिसगाव, द्वितीय-दुर्गादेवी माध्यमिक विद्यालय जाटदेवळे, तृतीय क्रमांक-श्रावण भारती विद्यालय मुंगूसवाडे, १९ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक बाबूजी आव्हाड महाविद्यालय,पाथर्डी.द्वितीय-भगवानबाबा ज्युनियर कॉलेज खरवंडी, तृतीय -एम ,एम,निऱ्हाळी उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी यांनी बाजी मारली. तर मुलींमध्ये १४ वर्षाच्या वयोगटात प्रथम क्रमांक-स्वामी विवेकानंद विद्यालय पाथर्डी, द्वितीय-दुर्गादेवी माध्यमिक विद्यालय जाटदेवळा, तृतीय क्रमांक-भगवान विद्यालय खरवंडी. १७ वयोगट-प्रथम-दुर्गादेवी माध्यमिक विद्यालय जाटदेवळा, द्वितीय-भगवानबाबा विद्यालय खरवंडी, तृतीय-पाडळी हायस्कुल, पाडळी, १९ वर्ष वयोगट-प्रथम-भगवानबाबा ज्युनियर कॉलेज पाथर्डी, द्वितीय-रुख्मिणीबाई फुंदे विद्यालय चिंचपुर ईजदे, तृतीय क्रमांक- छत्रपती शिवाजी विद्यालय,मिरी यांनी बक्षिसे मिळवली. या सर्व विजेत्यां संघांना ग्रामपंचयत सदस्य विष्णू खाडे, उद्धव केदार , पत्रकार सोमराज बडे ,श्री वामनभाऊ विद्यालय शिक्षक आदींच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी विनोद ढाकणे ,बाळासाहेब दहिफळे,बाळासाहेब घुले,बाबासाहेब राजगुरू आदिंसह शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. यावेळी
कुदळ सर, जाधव सर, मर्दाने सर, अकोलकर सर, गर्जे मॅडम, श्री तिलोकजैन विद्यालयाचे पठाण सर,श्री वामनभाऊ विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.