चिंचपूर पांगुळ, मानेवाडी सेवा संस्थांची निवडणूक जाहीर

👉चिंचपूर पांगुळ सेवा संस्थेच्या एकमेव  ‘विजाभज’ या जागेसाठी ३ अर्ज दाखल
👉दोन्ही सेवा संस्थेच्या निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत नसलेल्या व विकासात्मक दृष्ट्या नेहमीच मागास असणाऱ्या चिंचपूर पांगुळ परिसरातील मानेवाडी सेवा संस्थेच्या एकूण  ११ जागांसाठी तर चिंचपूर पांगुळ सेवा संस्थेच्या  १३ जागांसाठी नुकत्याच या दोन्ही विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आतापर्यंत मानेवाडी सेवा संस्थेच्या प्रत्येकी एकजागेसाठी एकमेव उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत, यामुळे मानेवाडी बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा! तर चिंचपूर पांगुळ सेवा संस्थेच्या ‘विजाभज’ या एकमेव जागेसाठी ३ उमेदवारीअर्ज दाखल तर उर्वरित जागेसाठी एकमेव उमेदवार अर्ज दाखल झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार दि.३१ मे २०२२ ही अंतिम मुदत आहे. चिंचपूर पांगुळ सेवा संस्थेच्या एकमेव ‘विजाभज’ या जागेसाठी ३ अर्ज दाखल झाले आहेत.  ३ पैकी जर कोणत्याही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यास चिंचपूर पांगुळ सेवा संस्था निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा होईल, अन्यथा उमेदवार अर्ज राहिल्यास एकमेव ‘विजाभज’ या जागेसाठी दि.१३ जून २०२२ ला मतदान होईल. मानेवाडी सेवा संस्थेचे एकूण १९४ मतदार आहे, तर चिंचपूर पांगुळ सेवा संस्थेचे ६६५ मतदार आहेत. यामुळे दोन्ही सेवा संस्था निवडणुका पूर्णपणे  बिनविरोध होतील का?, यासाठी दि.३१ मे पर्यंत चिंचपूर पांगुळ पंचक्रोशीतील नागरिकांना वाट पाहावी लागेल.


चिंचपूर पांगुळ व मानेवाडी या दोन्ही सेवा संस्थांवर गेली अनेक वर्षापासून स्व. माजी आ. दगडू पाटील बडे यांचेच वर्चस्व राहिले आहे, तेच वर्चस्व कायम राहण्यासाठी युवा नेते धनंजय पा. बडे व ज्येष्ठ नेते शामराव पा.बडे यांचा प्रयत्न राहिला आहे. यामुळेच नुकत्याच जाहीर झालेल्या मानेवाडी सेवा संस्थेच्या ११ जागांसाठी एकूण ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, येथे कोणत्याही जागेसाठी प्रतिस्पर्धी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही, यामुळे मानेवाडी संस्थेची ही निवडणूक बिनविरोध ! तर चिंचपूर पांगुळ सेवा संस्थेच्या एकूण १३ जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सेवा संस्थेच्या उर्वरित जागेसाठी प्रतिस्पर्धी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत, यामुळे त्या सर्व जागा बिनविरोध झाले !, एकमेव ‘विजाभज’ या जागेसाठी एकूण ३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने चिंचपूर पांगुळ सेवा संस्था पूर्णपणे बिनविरोध होईल का?, याकडे  चिंचपूर पांगुळ पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चिंचपूर पांगुळ सेवा संस्थेच्या १३ जागांसाठी सर्वसाधारण कर्जदार उमेदवारी अर्ज – युवानेते धनंजय पा.बडे, आजिनाथ शिवाराम बडे, बयाजी किसन आंधळे, दादासाहेब मारुती बडे, बाबासाहेब दत्तू बडे, केशव राजेंद्र होडशिळ. महिला उमेदवारी अर्ज- कौशल्या मुरलीधर बडे, गयाबाई सोपान बडे. एसीमधून उमेदवार अर्ज- भाऊसाहेब लक्ष्मण रंधवे. ओबीसीमधून उमेदवारी अर्ज- जलील अकबर शेख. तर ‘विजाभज’मधून उमेदवार अर्ज- प्रकाश एकनाथ बडे, रामदास नाना आंधळे, अण्णा उत्तम बडे.
मानेवाडी सेवा संस्थेच्या एकूण ११ जागांसांठी सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार अर्ज- शिवाजी मारुती बडे, राजेंद्र नारायण कुटे, शहादेव श्रीधर पोफळे, बबन त्रिबंक संकुडे, सोमनाथ पाडुरंग संकुडे, राम विठ्ठोबा बडे, बळीराम निवृत्ती धायतडक, सुर्यभान मारुती संकुडे. महिला उमेदवार- शैला तुकाराम डोंगरे, राजश्री ज्ञानदेव पाचपुते. विजाभज’मधून उमेदवार – अशोक नामदेव बडे. असे एकंदरीत आतापर्यंत दोन्ही सेवा संस्थेचे चिञ आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!