संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
पाथर्डी – डोंगराळ दुर्गम भागात नेहमीच जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्षित असणा-यांपैकी पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व अंगणवाडी खोल्या सुरु झालेल्या पावसात गळल्या आहेत. यामुळे मुलांना अक्षराश: बसण्यास जागा राहिली नाही, या गंभीर समस्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने जातीने लक्ष देऊन झालेल्या प्रकाराची चौकशी करावी, तथा प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
यापूर्वी नगर तालुक्यातील निबोंडी येथील शाळा पडून विद्यार्थ्यांना जीव गमावावे लागले होते, या घटनेचे आजही अंगावर शहारे उभे राहातात. यामुळे या डोंगराळ परिसरातील चिंचपूर पांगुळ येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी खोल्याची जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. या प्रकरणाची चौकशी करून यात दोषी असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शाळा खोल्या गळल्याने मुलांना बसण्याची गैरसोय झाली आहे. मुलांना खोलीच्या कोप-यात बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. हे दृश्य पाहण्यास मिळले आहे. या शाळासाठी जिल्हा परिषद वर्षानो वर्षे लाखो रुपये खर्च करत असताना हे काम म्हणजे निकृष्ठ झाले की काय?. यामुळे या शाळा कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.