संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- ग्रामीण तथा डोंगर परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत जाण्यासाठी सोय व्हावी, या भावनेतून काही सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने ‘सायकल बँक’ या उपक्रमातून चिंचपूर इजदे येथे गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या.
नागरिकांकडे असलेल्या जुन्या,वापरात असलेल्या किंवा नसलेल्या सायकली गोळा करून,त्यांची दुरुस्ती करुन ग्रामीण भागातील असा दूरवर असलेल्या शाळेत पायी जाणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्याचा उपक्रम….. याचाच एक भाग म्हणून शिक्षणयज्ञ चिंचपूर इजदे समूहाच्या वतीने जवाहर विद्यालय चिंचपूर इजदेतील दोन होतकरु विद्यार्थ्यांना सायकलची भेट देण्यात आल्या.
या उपक्रमासाठी महिला बचत गट मार्गदर्शिका श्रीमती भारती काटकर-असलकर मॕडम यांचे सहकार्य मिळाले असून, युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य,संस्थापक अध्यक्ष प्रविण महाजन, मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान जालना संस्थापक अध्यक्ष अजय किंगरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम वास्तविक पुढे आला आहे. या सामाजिक भावनेतून सुरु केलेल्या उपक्रमातून गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना एक मदतीची हात म्हणून आपणाकडे अशी जुनी वापरात असलेली अथवा वापरत नसलेली सायकल असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.